Advertisement

Health Tips : तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. दुर्गंधीमुळे आपल्याला त्रास होतोच, पण त्यामुळे आपल्या सभोवतालच्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. श्‍वासाची दुर्गंधी अनेक कारणांमुळे येऊ शकते. जसे की, दात साफ न करणे, तोंडाचा संसर्ग, खाण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन, काही आजार किंवा औषधे इ. कारण काहीही असो, दुर्गंधीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, आपण काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून पाहू शकतो ज्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊया श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काही प्रभावी आणि रामबाण घरगुती उपाय कोणते आहेत.

लवंगाचा वापर करा

लवंगमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करू शकतात. तुम्ही लवंगा तोंडात ठेवून चघळू शकता.

लिंबू पाण्याचे सेवन करा

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे तोंडात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते. तुम्ही पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून काही वेळ तोंडात ठेवू शकता आणि नंतर गुळण्या करू शकता.

टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा वापरा

बेकिंग सोडा तोंडाची आम्लता कमी करते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी निर्माण करणार्‍या बॅक्टेरियाची वाढ रोखता येते. तुम्ही तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करू शकता किंवा पाण्यात मिसळून तोंड स्वच्छ धुवू शकता.

तुळशीच्या पानांचे सेवन करा

तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुम्ही तुळशीची पाने चावू शकता किंवा चहामध्ये टाकू शकता.

बडीशेप आणि वेलची फायदेशीर

या दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. जेवणानंतर थोडी बडीशेप आणि वेलचीचे सेवन करू शकता.

जर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे या काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही याचा त्रास होणार नाही. त्यामुळे आजपासूनच या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/jvpu2md Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल फक्त 'या' 5 घरगुती टिप्स फॉलो करा; दिवसही उत्साही राहीलhttps://ift.tt/qayeQin
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल फक्त 'या' 5 घरगुती टिप्स फॉलो करा; दिवसही उत्साही राहीलhttps://ift.tt/qayeQin