Advertisement

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना वारंवार हातांना आणि पायांना मुंग्या येतात. इतकंच नाही तर काही वेळ उभे राहिल्यानंतर बोटांमध्ये मुंग्या यायला सुरुवात होते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला यामागे नेमकं कोणतं कारण असू शकतं या संदर्भात सांगणार आहोत. खरंतर, हा सगळा अभाव आहे तो जीवनसत्वांच्या कमतरतेचा. आपल्या शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्या हाता-पायांना मुंग्या येतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्सच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो तसेच मज्जातंतूंच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात

आपल्या शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात. खरंतर, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ, पायांमध्ये पॅरेस्थेसिया, स्नायूंना क्रॅम्प येणे, चक्कर येणे, गोंधळणे, थकवा आणि नैराश्य यांसारख्या समस्या दिसतात. त्याचं सर्वात मोठं कार्य मज्जातंतूला जोडणे आहे. यामुळे, स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि नसांची शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात.

शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय खावे?

तुम्हाला जर तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर त्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. तुमच्या आहारात तुम्ही मांस, मासे, दूध, चीज आणि अंडी यांचं सेवन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच धान्याची भरडही तुम्ही खाऊ शकता.

शरीराल व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे तर आपल्याला माहीत आहे पण त्याचबरोबर कोणत्या पदार्थांनी शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ शकते हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. यासाठी, अल्कोहोल, कॉफी, प्रक्रिया केलेले अन्न यांचं सेवन टाळावं.

अनेक अहवालांमध्ये हे देखील समोर आले आहे की, हात आणि पायांना मुंग्या येण्याचे कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 नाही तर इतर अनेक जीवनसत्त्वांचा अभाव आहे. मात्र, काही लोकांना योग्य आहार मिळत नाही म्हणून जीवनसत्त्वाची कमतरता भासते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/o5AYrv7 Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हाता-पायांना वारंवार मुंग्या येतात? शरीरात 'या' जीवनसत्त्वाची कमतरता; 'या' पदार्थांचं सेवन करणं फायदेशीरhttps://ift.tt/IfFn4A2
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हाता-पायांना वारंवार मुंग्या येतात? शरीरात 'या' जीवनसत्त्वाची कमतरता; 'या' पदार्थांचं सेवन करणं फायदेशीरhttps://ift.tt/IfFn4A2