Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर २५, २०२३ WIB
Last Updated 2023-09-25T00:49:17Z
careerLifeStyleResults

Health Tips : कोरफडीचा रस हा अनेक गुणधर्मांचा खजिना; फक्त त्वचाच नाही तर आरोग्यासाठीही गुणकारी

Advertisement

Health Tips : अनेकदा आपण घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून तज्ज्ञांकडून ऐकलं आहेच की कोरफडचे <a href="https://ift.tt/ROT4fMK Vera) किती फायदे आहेत. कोरफड तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे आणि यामुळे तुमचे सौंदर्य जास्त वाढतं. कोरफड ही एक अतिशय सामान्य वनस्पती आहे, जी तुम्हाला तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत दिसते. ही वनस्पती दिसायला अगदी साधी असली तरी तिचे फायदे मात्र अनेक आहेत. चला जाणून घेऊयात कोरफडीचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत.

कोरफड (Aloe Vera) एक अशी वनस्पती आहे ज्याच्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये भरपूर पाणी असते. तुम्ही ते तुमच्या घरात सहज वाढवू शकता. त्याची काळजी घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून कोरफड वाढवणे खूप सोपे आहे. कोरफडीची पाने काढून त्याचा रस तुम्ही सहजपणे काढू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा रस विकतही घेऊ शकता.

रक्तातील साखर कमी करते

कोरफड स्वादुपिंडाच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते. हे इन्सुलिनची पातळी देखील वाढवते, जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. इतर रसांच्या तुलनेत त्यात साखर कमी असते, ज्यामुळे कोरफड आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी फायदेशीर आहे

कोरफड कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे तुमच्या त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करते. हे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या येण्यापासून रोखते आणि तुमची त्वचा घट्ट करण्यास मदत करते. याशिवाय मुरुमांपासून दूर राहण्यासही मदत होते. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि त्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.

अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध

कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. हे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी घटक देखील असतात, जे दुखापतींसाठी फायदेशीर असतात.

पचनास मदत करते

कोरफड पाचन समस्या, विशेषतः बद्धकोष्ठता यांच्याशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यात रेचक गुणधर्म आहेत, जे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहेत. तसेच यामुळे हार्ट बर्नपासून आराम मिळतो. तसेच, कोरफडीच्या रसाचे प्रमाण आणि त्यात कोणते घटक आहेत याची काळजी घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Po0tqrb Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : कोरफडीचा रस हा अनेक गुणधर्मांचा खजिना; फक्त त्वचाच नाही तर आरोग्यासाठीही गुणकारीhttps://ift.tt/fmpUzA3