Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०४, २०२३ WIB
Last Updated 2023-09-04T04:51:05Z
careerLifeStyleResults

Health Tips: क्या आपके टूथपेस्ट में नमक है? खरंच मीठ असलेल्या टूथपेस्ट चांगल्या असतात का? जाणून घ्या

Advertisement

Health Tips: तुम्ही टीव्हीवर अनेक अनेक टूथपेस्टच्या (Toothpaste) जाहिराती पाहिल्या असतील, ज्यात टूथपेस्ट कंपन्या त्यांच्या ग्राहकांना आग्रहाने विचारतात, 'क्या आपके टूथपेस्ट में नमक है?', म्हणजेच तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? असं विचारुन त्यांना असं सूचित करायचं असतं की, ज्या टूथपेस्टमध्ये मीठ (Salt) असतं त्या सर्वोत्तम असतात.

आता प्रश्न असा पडतो की, टूथपेस्टमध्ये खरंच मीठ आहे का? यासोबतच जर टूथपेस्टमध्ये मीठ असेल तर ते दातांसाठी कितपत फायदेशीर आहे आणि त्याचा आपल्या दातांवर कसा परिणाम होतो? तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. टूथपेस्टचा शोध कधी लागला? हे सर्वप्रथम जाणून घेऊया.

टूथपेस्टचा शोध कधी लागला?

टूथब्रशचा शोध लागण्यापूर्वी टूथपेस्टचा शोध लागला असं इतिहासकारांचं मत आहे. वास्तविक, इजिप्शियन लोकांनी सुमारे 5000 इ. स. पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी पेस्ट बनवली. मात्र, त्यावेळी ती टूथपेस्ट म्हणून ओळखली जात नव्हती. यानंतर ग्रीक आणि रोमन लोकांनी अशा प्रकारच्या टूथपेस्टचा (Toothpaste) वापर केला. तर, भारत आणि चीनबद्दल बोलायचं झालं तर, इथल्या लोकांनी देखील सुमारे 5000 इ. स. पूर्वीच टूथपेस्टचा पहिला वापर केला.

टूथपेस्टमधील घटक समजून घ्या

वास्तविक, टूथपेस्ट बनवण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल वापरले जातात. हे केमिकल आपल्या दातांचे संरक्षण करतात आणि त्यांना स्वच्छ ठेवतात. त्यात आढळणारे ऍब्रेसिव्ह (Abrasives), फ्लोराईड्स (Fluorides), डिटर्जंट्स (Detergents) आणि ह्युमेक्टंट्स (Humectants) आपल्या दातांवरील प्लाक आणि घाण काढून टाकण्यास मदत करतात, तर ‘फ्लोराइड’ दातांवरील इनॅमल मजबूत करून पोकळी (Cavity) रोखण्यास मदत करते. यामध्ये असलेलं डिटर्जंट टूथपेस्टमध्ये फेस आणण्याचं काम करते.

टूथपेस्टमधील मीठाची भूमिका किती महत्त्वाची?

तर पेस्टमध्ये असलेले 'ह्युमेक्टंट्स' टूथपेस्टला कोरडं होऊ देत नाहीत. या सर्व घटकांशिवाय टूथपेस्टमध्ये मीठ देखील आढळतं आणि ते आपल्या दातांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. मीठाचं सर्वात मोठं काम म्हणजे तोंडातील लाळ वाढवणं, यामुळे तोंडातील जंतू निघून जातात. याशिवाय, मीठ दातांमध्ये असलेले नैसर्गिक इनॅमल कॅल्शियम आणि फ्लोराईडला अधिक संवेदनशील बनवते आणि मीठामध्ये हिरड्यांची सूज आणि जळजळ कमी करण्याची शक्ती असते. त्यामुळे एकंदरीत मीठ हा आपल्या टूथपेस्टचा महत्त्वाचा भाग आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/S2G9bXZ Disorder : तुम्हीही झोपेत बडबड करताय? 'हे' असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण; दुर्लक्ष करु नका अन्यथा...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: क्या आपके टूथपेस्ट में नमक है? खरंच मीठ असलेल्या टूथपेस्ट चांगल्या असतात का? जाणून घ्याhttps://ift.tt/OqZEWSA