Advertisement
हाताला घाम येणे
हातांना जास्त घाम येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिक्रियाशील नसा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नसा अतिक्रियाशील कशा होतात? तर, हे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे असू शकते. त्यामुळे घाम स्राव करणाऱ्या ग्रंथी खूप सक्रिय होतात. आणि हाताला घाम येऊ लागतो. हा आजार जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आणि मज्जातंतूंच्या कार्यामुळे होऊ शकतो.
'या' आजाराचा रुग्ण असू शकतो
जर तुम्हाला सामान्य किंवा कमी तापमानात जास्त घाम येत असेल तर त्याचा थेट संबंध 'हायपरहाइड्रोसिसशी' असतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे जास्त घाम येऊ लागतो. या रुग्णांना हात, पाय आणि काखेत भरपूर घाम येऊ लागतो.
या आजाराचे दोन प्रकार आहेत
हायपरहाइड्रोसिस रोगाचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक. प्राथमिक हायपरहाइड्रोसिसमध्ये घाम येण्याची अनेक गंभीर कारणे असू शकतात. तर, माध्यमिक हायपरहाइड्रोसिस ग्रस्त रुग्ण इतर अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतात. केंड्री हायपरहाइड्रोसिस देखील हाय ब्लड शुगर, लो ब्लड शुगर, हायपरथायरॉईडीझम सारखे इतर अनेक रोग होऊ शकतात.
एखाद्या व्यक्तीला हायपरहाइड्रोसिस कधी होतो?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घामाच्या ग्रंथी सक्रिय होतात तेव्हा त्याला हायपरहाइड्रोसिस होतो. अति धूम्रपान, तणाव, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीमुळे एखाद्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय मधुमेह, रजोनिवृत्ती, थायरॉईड, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जास्त घाम येण्याची समस्या देखील भासू शकते.
या घरगुती उपायांचा वापर करा
जास्त घामामुळे शरीराला दुर्गंधी येते. हे टाळण्यासाठी लोक शक्य तितक्या परफ्युमचा वापर करतात. यामुळे अनेकांना सार्वजनिक ठिकाणी लाज वाटते. वारंवार हात, चोळण्याची, घाम येण्याच्या समस्येपासून जर मुक्त व्हायचं असेल तर, एका वाटीत 4-5 टीबॅग ठेवा. आणि त्या पाण्यात हात घाला. तुम्हाला काही काळासाठी आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/9IzBkdh Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुमच्याही हातांना वारंवार घाम येतो? वेळीच सावध व्हा, 'या' गंभीर आजाराचा असू शकतो धोकाhttps://ift.tt/72pR64n
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुमच्याही हातांना वारंवार घाम येतो? वेळीच सावध व्हा, 'या' गंभीर आजाराचा असू शकतो धोकाhttps://ift.tt/72pR64n