Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ३०, २०२३ WIB
Last Updated 2023-09-30T06:50:46Z
careerLifeStyleResults
Health Tips : जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक; 'या' गंभीर आजाराचा वाढता धोका
Advertisement
Health Tips : जेवणात चव आणण्यासाठी आपण अनेकदा जास्त मीठ वापरतो. पण जास्त मीठाचं सेवन केल्याने आपल्या आरोग्याचं नुकसान होते. याबाबत अनेकांना कल्पना नसते. मात्र, यामुळे आपल्या हाडांचं खूप नुकसान होते. मिठामध्ये असलेले सोडियम शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. सोडियम कॅल्शियम शरीराबाहेर ढकलते. त्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन ते कमकुवत होऊ लागतात.
याशिवाय अतिरिक्त मीठ शरीरातील पाणी काढून टाकते, ज्यामुळे हाडांच्या पेशी कमजोर होतात. दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेणे हानिकारक ठरू शकते, असा सल्ला डॉक्टर देतात. तुमची हाडे मजबूत ठेवण्यासाठी, तुमच्या जेवणातील मीठ कमी करणं गरजेचं आहे तसेच निरोगी राहण्यासाठी तितकेच ताजे अन्न खाणे देखील गरजेचं आहे.
जाणून घ्या ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?
त्याची लक्षणे जाणून घ्या
हाडे दुखणे आणि सूज येणे.
हाडे ठिसूळ होणे.
काम केल्यानंतर थकवा जाणवणे.
उंची कमी होणे.
पाठीचा कणा वाकणे.
ऑस्टियोपोरोसिस कसा टाळता येईल?
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या. दूध, दही, चीज, भाज्या इत्यादी खा.
मीठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नका.
सूर्यप्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन डी घ्या. दररोज किमान 15-20 मिनिटे उन्हात बसा.
व्यायाम आणि योगासने करा. वजन उचलण्याचे व्यायाम ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत करतात.
धूम्रपान करू नका. धूम्रपान केल्याने तुमची हाडे कमकुवत होतात.
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेसाठी उपचार घ्या. कमी टेस्टोस्टेरॉनमुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/dUDWQ7K Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक; 'या' गंभीर आजाराचा वाढता धोकाhttps://ift.tt/psR795J