Advertisement

Health Tips : सांंधेदुखी, गुडघेदुखी हा त्रास म्हटल्यावर साधारणत: ज्येष्ठ व्यक्ती डोळ्यांसमोर येतात. मात्र, वयाच्या तिशीतच तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतोय? तुमचे सांधे दुखू लागतायत? तर, मात्र वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हे शरीरातील काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या वेळीच ओळखली नाही, तर काही वर्षांतच तुम्हाला गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.

डॉक्टरांच्या मते, आजकाल बहुतेक लोक आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतात. वेळी-अवेळी जेवण केल्यामुळे शरीरात अनेक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या 30 वर्षापर्यंतच्या लोकांमध्ये जास्त दिसून येते. दिवसभर बसून राहिल्यानेही हा त्रास होऊ शकतो.

संधिवाताची लक्षणं असू शकतात

तज्ज्ञांच्या मते, आजकाल सांधेदुखीची समस्या लहान वयात उद्भवू शकते. पूर्वी हा त्रास वयाच्या 60 वर्षानंतरच होत होता. काही केसेसमध्ये तर लहान मुलेही याचे बळी ठरत आहेत. सांधेदुखीमुळे गुडघेदुखी होते. तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता नसेल आणि तुमचे गुडघे दुखत असतील तर सांधेदुखीची वेळीच तपासणी करा. हा आजार वेळीच ओळखून त्यावर सहज उपचार करता येतात. जितक्या लवकर हे आढळून येईल तितक्या लवकर हा रोग गंभीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत चालणेही कठीण होते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गुडघेदुखी

तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही गुडघेदुखी होऊ शकते. आहार चांगला नसेल तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा गुडघेदुखी होते तेव्हा कॅल्शियम रक्त तपासणी करून घ्यावी. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. दूध, ब्रोकोली, मासे आणि ड्रायफ्रूट यांचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांनीही कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.

यावर उपचार काय?

जर शरीरात व्हिटॅमिन बी आणि सीची कमतरता असेल तर आहाराची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घ्या. अनेक वेळा व्हिटॅमिनची कमतरता औषधे आणि इंजेक्शन्सद्वारे भरून काढली जाते. जर शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी योग्य असेल तर हा त्रास सांधेदुखीमुळेही होऊ शकतो. अशा वेळी जराही निष्काळजी न करता वेळीच उपचार घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Po0tqrb Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वयाच्या तिशीतच गुडघेदुखीचा त्रास? वेळीच काळजी घ्या, अन्यथा 'हा' त्रास वाढेलhttps://ift.tt/fmpUzA3
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वयाच्या तिशीतच गुडघेदुखीचा त्रास? वेळीच काळजी घ्या, अन्यथा 'हा' त्रास वाढेलhttps://ift.tt/fmpUzA3