Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ३ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०३, २०२३ WIB
Last Updated 2023-09-03T12:49:04Z
careerLifeStyleResults

Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी नाशिक येथून 250 बसेस, भाविकांसाठी दर पाच मिनिटाला बस, असं आहे नियोजन

Advertisement

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरला (Trimbakshwer) तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी (Shravni Somwar) राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाहतुकीसाठी दर पाच मिनिटाला बस सोडण्याचे नियोजन एस.टी. महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तिसऱ्या सोमवारी भाविकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने 250  जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते.

देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या (trimbakeshwer Mandir) दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ असते. श्रावणात ही गर्दी अनेकपटींनी वाढते. श्रावणातील सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला फेरी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी असंख्य हजारो भाविक ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांना एसटी महामंडळाच्या बसेसचीच मदत घ्यावी लागणार आहे. तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी (Bramhgiri) रविवारपासूनच भाविक त्र्यंबकेश्वर परिसरात दाखल होत असतात. त्यामुळे रविवारी सायंकाळपासून जादा बसेस (Bus Service) सोडण्यात येत आहेत.

नाशिक शहराला धार्मिक महत्व आहे, त्याचबरोबर नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Tryambakeshwer Jotirlinga) देखील महत्वाचं मानलं जात. जोतिर्लिंग दर्शनासाठी रोजच हजारो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होत असतात. विशेष म्हणजे श्रावणात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. उद्या तिसऱ्या सोमवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आजपासूनच त्र्यंबकनगरीत भाविक भक्त दाखल होतात. तसेच तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्व आहे. प्रदक्षिणा करणाऱ्यांमध्ये भाविकांसह निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचाही सहभाग असतो.

सिटी लिंकच्या 47 बस दिमतीला

दरम्यान तिसऱ्या श्रावणी सोमवारची राज्य परिवहन महामंडळाकडून 250 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरसाठी दर पाच मिनिटाला बस सुटणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर 180 बस, अंबोली ते त्र्यंबकेश्वर 10 बस, पहिने ते त्र्यंबकेश्वर 10 बस, घोटी ते त्र्यंबकेश्वर 10 बस, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर 40 बस अशी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणाऱ्या सिटी लिंकच्या माध्यमातून देखील २२ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित 25 व जादा 22 असा एकूण 47 जादा बसेस त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार असल्याची माहिती सिटी लिंकच्या अधिकाऱ्यांनी दिली.

खासगी वाहनांना बंदी

दरम्यान आजपासूनच त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली असून खासगी वाहनांसाठी खंबाळे, पहिने, तळवाडे, आंबोली आदी ठिकाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी वाहनांना खंबाळ येथे थांबवण्यात येणार असल्याने तेथे वाहनतळ व बस स्थानक यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान वाहनतळ आणि बस स्थानकावर फिरते शौचालय उभे करण्यात आले आहेत. विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर बस स्थानकात खडीकरण करण्यात आले असून खंबाळ ते त्र्यंबक या मार्गावर रविवार दुपार ते सोमवार असे दीड दिवस केवळ एसटीचे राज्य असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी :

<a href="https://ift.tt/rUmyJ0W Somwar : त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी फेरीला जायचंय, ही बातमी तुमच्यासाठी! ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कशी करावी, जाणून घ्या एका क्लिकवर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी नाशिक येथून 250 बसेस, भाविकांसाठी दर पाच मिनिटाला बस, असं आहे नियोजनhttps://ift.tt/OqZEWSA