Advertisement

<a title="Woman Health " href="https://ift.tt/qPn802W" target="_self">Woman Health : अनेक महिलांना शेपवेअर घालणे खूप आवडते. याचे कारण असे की, ते परिधान केल्यानंतर कोणत्याही आकाराच्या स्त्रिया फिट आणि आत्मविश्वासू दिसतात. स्त्रिया अनेकदा शरीराला परिपूर्ण आकार देण्यासाठी शेपवेअर वापरतात. स्लिमिंग बॉडी सूटपासून ते टमी कंट्रोल पॅन्टीपर्यंत, स्त्रिया बहुतेकदा या कारणासाठी वापरतात. आपल्यापैकी अनेक स्त्रिया आहेत ज्या प्रेझेंटेबल आणि आत्मविश्वासू दिसण्यासाठी शेपवेअर वापरतात. पण अनेक महिलांना हे माहीत नसते की रोज शेपवेअर परिधान केल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. (Health News)

शेपवेअरमुळे संसर्ग कसा होतो?

तुमच्या माहितीसाठी, शेपवेअरचा रोज वापर करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, यूरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनपासून यीस्ट इंफेक्शनचा धोका कायम आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण हे रोज परिधान केल्याने होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

शेपवेअर घातल्याने महिलांना हे आजार होऊ शकतात

योनी भागातील संसर्ग

दररोज शेपवेअर परिधान केल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) धोका वाढू शकतो. कपड्यांच्या जास्त फिटमुळे, मूत्रमार्गाच्या संपूर्ण कार्यावर दबाव येऊ शकतो. ज्यामुळे मूत्रमार्गात जंतूची वाढ होते. त्यामुळे UTI होण्याची शक्यता वाढू शकते. काही शेपवेअर परिधान केल्याने चिडचिड किंवा अस्वस्थता येते. तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा अन्यथा संसर्गाचा धोका वाढू शकतो.

यीस्ट संसर्ग

शेपवेअरसारखे घट्ट कपडे परिधान केल्याने योनी भागात अस्वस्थता आणि उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे यीस्ट वाढण्याचा धोका वाढतो. असे घट्ट बसणारे कपडे परिधान केल्याने त्या भागात खाज आणि जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला त्या ठिकाणी खाज येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचा संसर्ग

खूप घट्ट शेपवेअर घातल्याने तुमच्या त्वचेत संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि संसर्ग होऊ शकतो. यामुळे, त्वचेवर ओरखडे देखील येऊ शकतात. शेपवेअर घातल्यामुळे तुम्हाला त्या भागात लाल ठिपके आणि सूज आली असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पाठदुखी

दररोज शेपवेअर परिधान केल्याने तुमच्या ओटीपोटात आणि पाठीच्या स्नायूंवर जास्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे कालांतराने पाठदुखी आणि अस्वस्थता होऊ शकते. याशिवाय, खूप घट्ट शेपवेअर असलेले कपडे तुमचे स्नायू ताणू शकतात ज्यामुळे पाठदुखी आणखी वाढू शकते. शेपवेअर परिधान करताना पाठदुखी किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असल्यास तो पुढे जाऊन गंभीर आजार बनू शकतो.

पचन समस्या

शेपवेअरमुळे तुमच्या पचनशक्तीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला गॅस, पोट फुगणे, पेटके येणे आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. जास्त वेळ जास्त घट्ट कपडे परिधान केल्याने पोट आणि आतडे आकुंचन पावतात. यामुळे तुमच्या रक्ताभिसरणावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही सैल-फिटिंग कपडे घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/cNqEVF6 Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Woman Health : महिलांनो, तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? 'हे' दुष्परिणाम वाचले? आरोग्यतज्ज्ञ म्हणतात...https://ift.tt/vmEhapB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Woman Health : महिलांनो, तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? 'हे' दुष्परिणाम वाचले? आरोग्यतज्ज्ञ म्हणतात...https://ift.tt/vmEhapB