Advertisement
पांढरे केस टाळण्यासाठी 5 आयुर्वेदिक उपाय
मेहंदी
मेहंदीचा वापर बहुतेक पांढर्‍या केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी केला जातो. मेहंदी केसांना रंग देते आणि केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते. केसांना मेंदी लावण्यासाठी लोखंडाच्या भांड्यात मेंदी विरघळून रात्रभर तशीच राहू द्या. त्यात आवळा पावडरही टाकू शकता. ही मेहंदी सकाळी केसांना लावा आणि एक ते दोन तासांनी पाण्याने धुवा.
भृंगराज तेल
भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. भृंगराजमध्ये असलेली हरितकी केसांसाठी वरदान आहे. भृंगराज तेल केस काळे तर ठेवतेच पण ते निरोगीही ठेवते. भृंगराज तेल इतर तेलात मिसळून लावावे. तुम्ही एरंडेल तेलात मिसळून लावल्यास जास्त फायदा होतो. याबरोबरच भृंगराज पावडर हेअर पॅक म्हणूनही वापरता येते. आठवड्यातून एकदा भृंगराज पावडर हेअर पॅक केसांवर अर्धा तास लावल्यास फायदा होईल.
कांदा
कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना निरोगी तर बनवतेच शिवाय त्यांना नैसर्गिक शाईनही देते. यासाठी कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. आवळा आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून हेअर पॅक म्हणून वापरता येते. यासाठी अर्ध्या वाटी खोबरेल तेलात दोन चमचे आवळा पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी ही पेस्ट टाळूवर आणि केसांना लावा. दोन तासांनंतर शॅम्पू करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/miV7ErB Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : पांढऱ्या केसांमुळे तुम्हीही हैराण आहात? आता चिंता सोडा, 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; केसांना नैसर्गिक शाईन येईलhttps://ift.tt/t4aYDUB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : पांढऱ्या केसांमुळे तुम्हीही हैराण आहात? आता चिंता सोडा, 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; केसांना नैसर्गिक शाईन येईलhttps://ift.tt/t4aYDUB