Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर २८, २०२३ WIB
Last Updated 2023-10-28T02:48:26Z
careerLifeStyleParenting Tips : तुमचे मूल बिघडत आहे का? वेळीच योग्य पावले उचला अन्यथा ....Results

Health Tips : सांधेदुखीचा त्रास असह्य होत असेल तर 'ही' 5 प्रकारची पाने गुणकारी; काही दिवसांतच फरक जाणवेल

Advertisement

Joint Pain Home Remedies : हवामानात थंडी वाढल्याने सांधेदुखीची समस्या दिसून येते. तसेच, हाडे आणि सांध्यांचे दुखणे सहसा वयानुसार दिसून येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे संधिवात.

संधिवात हा हाडांचा एक आजार आहे. ज्यामध्ये सांध्यामध्ये सौम्य ते तीव्र वेदना होऊ शकतात. वृद्ध लोकांमध्ये संधिवात दिसून येत असला तरी, तरुण लोकांमध्ये देखील हा त्रास होऊ शकतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे बिघडलेली जीवनशैली हे तरुणांमध्ये सांधेदुखीचे मुख्य कारण मानले जाते. तसेच, यामागे इतरही कारणे असू शकतात.

संधिवात वेदना शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढते तेव्हा उद्भवते, ज्यामुळे सांधे तीव्र वेदना होतात. युरिक ऍसिड सांध्यांच्या हाडांमध्ये प्रवेश करत असताना, स्फटिकासारखे संरचना विकसित होते. त्यामुळे हाडे एकमेकांवर झिजल्याने वेदना होतात. औषधांव्यतिरिक्त, घरगुती उपचार देखील तुम्हाला वेदनांमध्ये मदत करू शकतात.

'हे' नैसर्गिक उपाय तुम्हाला आराम देऊ शकतात

पुदीन्याची पाने

पुदिन्याची पाने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. त्यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. पुदिन्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे लघवीतील प्युरीन्स काढून सांध्यांची जळजळ कमी करतात.

कोथिंबीरीची पाने

कोथिंबीर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे कॅल्शियम, पोटॅशियम, थायामिन, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. कोथिंबीर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि रक्तातील यूरिक ऍसिड आणि क्रिएटिनिनची पातळी देखील कमी करते.

कोरफड

कोरफडीचा वापर सामान्यतः त्वचेसाठी केला जातो. कोरफड जेल फक्त उन्हात जळजळ, कोरडेपणा इत्यादींमध्ये उपयुक्त नाही, तर सांधेदुखीतही आराम देऊ शकतो. कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होते आणि वेदना कमी होते.

सुपारीची पाने

सुपारीच्या पानांमध्ये असे घटक आढळतात, जे लघवीद्वारे यूरिक ऍसिड योग्यरित्या काढून टाकण्यास मदत करतात. सुपारीची पाने सकाळी चघळल्यास दिवसभर सांधेदुखीपासून आराम मिळतो.

तमालपत्र

तुम्ही अनेकदा तमालपत्राचा वापर अन्नात केला असेल, पण त्याचे कार्य केवळ जेवणाची चव वाढवणे नाही तर आरोग्यासही लाभदायक आहे. तमालपत्राच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सांध्यांची सूज कमी होते. तमालपत्र पाण्यात उकळून ते प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Im8DlW7 Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सांधेदुखीचा त्रास असह्य होत असेल तर 'ही' 5 प्रकारची पाने गुणकारी; काही दिवसांतच फरक जाणवेलhttps://ift.tt/jtohi9Q