Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-10-08T06:49:36Z
careerLifeStyleResults
Health Tips : डोळ्यांची दृष्टीही निरोगी राहील, चष्माही लागणार नाही; फक्त 'या' टिप्स फॉलो करा
Advertisement
आजकाल लहान वयातच दृष्टी कमी होण्याची अनेक प्रकरणे पाहायला मिळतात. लहान मुलांनाही आता चष्मा लवकर लागतो. जर तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील आणि तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
स्क्रीन टाइमिंगकडे लक्ष द्या
आजकालच्या जीवनशैलीत, डोळ्यांची दृष्टी खराब होण्याची बहुतेक कारणे ही जास्त स्क्रीन टाईममुळे होतात. अशा स्थितीत आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइमिंग थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच स्क्रीनपासून ठराविक अंतर राखूनच काम करा. जर तुम्ही तासन् तास स्क्रीनसमोर बसून काम करत असाल तर अर्ध्या तासाच्या अंतराने 10 ते 20 सेकंद डोळे बंद करून आराम करा.
योग्य आहार घ्या
जर तुम्हाला तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील, तर तुमच्या आहारात केळी, अंडी, काजू, हिरव्या पालेभाज्या, बीन्स यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. कारण व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ल्युटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई डोळ्यांसाठी आवश्यक आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी मोतीबिंदू सारख्या वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांपासून तुमचे रक्षण करतात.
डोळ्यांची तपासणी महत्त्वाची
डोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे. मात्र, अनेकदा आपण त्याकडेच दुर्लक्ष करतो. यासाठी दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी नियमित अंतराने केली पाहिजे, जेणेकरून डोळ्यांशी संबंधित समस्या वेळेत ओळखता येतील.
या आजारांसाठी नियमित तपासणी करा
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये अगदी थोडीशी समस्या दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. याबरोबरच मधुमेह आणि रक्तदाब इत्यादींची नियमित तपासणी करावी. कारण यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
धूम्रपानापासून दूर राहा
धूम्रपान तुमच्या फुफ्फुसासाठी तर हानिकारक आहेच पण त्यामुळे तुमची दृष्टीही कमी होऊ शकते. धूम्रपानामुळे ग्लूकोमा आणि मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/cqDFrj6 Tips : तुमचे डोळे वारंवार कोरडे होतायत का? असू शकतात 'या' आजाराची लक्षणं; वेळीच 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : डोळ्यांची दृष्टीही निरोगी राहील, चष्माही लागणार नाही; फक्त 'या' टिप्स फॉलो कराhttps://ift.tt/zZMTDct