Advertisement
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थायरॉईड झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. तुमचाही गोंधळ होत असेल तर या ठिकाणी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
थायरॉईड रोग म्हणजे काय?
थायरॉईडला वैद्यकीय भाषेत हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम म्हणतात. आपल्या घशात एक ग्रंथी असते ज्याला थायरॉईड म्हणतात. जेव्हा थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायओडोथायरोनिन (T3) हे महत्त्वाचे संप्रेरक योग्यरित्या तयार होत नाहीत, तेव्हा थायरॉईड रोग होतो.
तज्ञ काय म्हणतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते थायरॉईड होण्याची अनेक कारणे आहेत. आहाराव्यतिरिक्त शरीरात सूज आल्यानेही ही समस्या उद्भवते. एक काळ असा होता की हा आजार 50 ते 60 वयोगटातील लोकांना होत होता. पण आता लहान मुलांना देखील याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
थायरॉईडमध्ये काय खावे?
जर तुम्हाला थायरॉईड असेल तर अंडी, धान्य खाऊ शकता. पण ते जास्त प्रमाणात खाऊ नयेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अंड्यांमध्ये सेलेनियम असते जे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. काजू खाल्ल्याने हार्मोनल संतुलन सुधारण्यासही मदत होते. जर एखाद्याला अशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खाव्यात.
आजारपणात 'या' पदार्थांपासून दूर राहा
सोयाबीन किंवा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉईडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित असावे. तुम्हाला हा आजार असल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढू शकते. कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी टाळा, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. या पदार्थांमध्ये थायरॉईडविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हा आजार वाढू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/EKQGhrs Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : थायरॉईड झाल्यास कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत? याबाबत संभ्रम असेल तर ही माहिती नक्की वाचा...https://ift.tt/D6AzbkC
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : थायरॉईड झाल्यास कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत? याबाबत संभ्रम असेल तर ही माहिती नक्की वाचा...https://ift.tt/D6AzbkC