Advertisement
<a href="https://ift.tt/0AfWCFH Recommends Malaria Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया रोगावरील <a href="https://ift.tt/TM3qiC9> या दुसऱ्या लसीला मंजुरी दिली आहे. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. मलेरियाची R21/Matrix-M ही नवी लस स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने दोन तज्ज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार या लसीला मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मलेरिया संशोधक म्हणून मी त्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा आपल्याकडे मलेरियाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल. आता आपल्याकडे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी दोन लसी आहेत. मलेरियाचा धोका असलेल्या मुलांमध्ये ही लस वापरण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. 
मलेरियावरील नव्या लसीला WHO कडून मंजुरी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII-Serum Institute of India) ने मलेरियावरील ही नवीन लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने इंडियन सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने मलेरियावर एक नवीन लस विकसित केली आहे. मलेरियावरील या लसीचं नाव R21/Matrix-M असून याचे तीन डोस आहेत. या संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, ही लस 75 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे आणि बूस्टर डोससह, किमान आणखी एक वर्ष संरक्षण मिळेल. टेड्रस यांनी सांगितलं की, या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे 2 ते 4 डॉलर्स म्हणजेच 160 ते 320 रुपये असेल. 
लहान मुलांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी R21/Matrix-M लस
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने लहान मुलांमध्ये मलेरिया रोखण्यासाठी R21/Matrix-M या नवीन लसीची शिफारस केली आहे. R21/Matrix-M लस ही WHO ने शिफारस केलेली दुसरी मलेरिया लस आहे. याआधी RTS,S/AS01 या मलेरियावरील पहिल्या लसीला 2021 मध्ये WHO कडून मंजुरी मिळाली होती. आता या दोन्ही लसी जगभरातील अनेक देशांमध्ये मलेरिया रोखण्यात मदत करतील. स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑन इम्युनायझेशन (SAGE) आणि मलेरिया पॉलिसी अॅडव्हायझरी ग्रुप (MPAG) आणि 25-29 सप्टेंबर रोजी झालेल्या नियमित द्विवार्षिक बैठकीनंतर WHO महासंचालकांनी या लसीला मान्यता दिली आहे.
मलेरियामुळे दरवर्षी अनेक लहान मुलांचा मृत्यू
अलिकडच्या काळात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे, त्या पार्श्वभूमीवर ही लस महत्वाची ठरणार आहे. मलेरियामुळे दरवर्षी अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो. भविष्यात हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने विविध योजनाही राबवल्या जात आहेत. आफ्रिकन प्रदेशातील मुलांमध्ये मलेरिया रोगाचा जास्त परिणाम दिसून येतो, येथे दरवर्षी लाखो मुलांना प्राण गमवावे लागतात.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मंजुरी, R21/Matrix M लस स्वस्त आणि प्रभावीhttps://ift.tt/WoOxNYL