Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर ११, २०२३ WIB
Last Updated 2023-10-11T12:50:46Z
careerLifeStyleResults
Navratri 2023: नवरात्रीत उपवासाला काय बनवताय? यावेळी राजगिरा हलवा करुन पाहा, नोट करा ही रेसिपी
Advertisement
Navratri Recipes: नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास (Navratri Fasting) करतात. उपवासासाठी अनेक पदार्थही बनवले जातात, परंतु 9 दिवस तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. अशात नवरात्रीच्या (Navratri 2023) उपवासात काही गोड खायची इच्छा असेल आणि नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाण्याचा कंटाळा येत असेल, तर चविष्ट राजगिरा हलव्याची रेसिपी (Rajgira Halwa Recipe) नक्की ट्राय करा. हा हलवा खायला जेवढा टेस्टी लागतो, तेवढाच तो बनवायलाही सोपा आहे. तुमच्यासोबत घरातल्या इतरांनाही ही रेसिपी नक्की आवडेल. तर याच राजगिरा हलव्याची रेसिपी (Recipe) जाणून घेऊया.
राजगिरी हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
राजगिरा पीठ
तूप
साखर
ड्राय फ्रूट्स
पाणी
राजगिरी हलवा बनवण्याची कृती
यानंतर एक वाटी तूप, एक वाटी साखर, 2 वाट्या पाणी आणि मूठभर चिरलेले ड्रायफ्रुट्स घ्या.
आता सर्वप्रथम पाणी आणि साखर मिसळून साखरेचा पाक तयार करा.
यानंतर कढईत थोडं गाईचं तूप टाका
तुपात राजगिऱ्याचं पीठ टाका
पीठ सोनेरी होईपर्यंत चांगलं भाजून घ्या.
यानंतर साखरेचा पाक घालून चांगलं शिजवा.
साखरेचा पाक पिठात चांगला मिसळला की त्यात चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
तुमचा स्वादिष्ट राजगिरा हलवा खाण्यासाठी तयार आहे.
शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व
नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
नवरात्र 9 दिवस का साजरी केली जाते?
शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस 'विजयादशमी' (दसरा) म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला. एका पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून देवी मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून, माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना, तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.
हेही वाचा:
<a href="https://ift.tt/3IxCANh 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा खमंग उपवासाचे अप्पे; पाहा बटाट्यांपासून बनलेल्या अप्प्यांची रेसिपी
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023: नवरात्रीत उपवासाला काय बनवताय? यावेळी राजगिरा हलवा करुन पाहा, नोट करा ही रेसिपीhttps://ift.tt/CMq01oA