Advertisement

Navratri Dandiya Benefits : देशभरात रविवारपासून नवरात्रीच्या <a href="https://ift.tt/WSaMFXU 2023) उत्सवाला सुरुवात होत आहे. एकीकडे भक्त नऊ दिवस दुर्गादेवीच्या पूजेत तल्लीन होणार आहेत, तर दुसरीकडे ठिकठिकाणी दांडिया रास खेळला जाणार आहे. दांडिया रास हे एक नृत्य आहे ज्यामध्ये भक्त देवीच्या पूजेसाठी आपल्या हातात दांडिया (Dandiya) घेऊन गरबा खेळतात. तसं पाहायला गेलं तर दांडिया नृत्याने जेवढं मन उत्साही होतं, तेवढंच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. चला तर जाणून घेऊयात दांडिया रास केल्याने तुम्हाला वजन नियंत्रित करण्याबरोबरच इतर अनेक फायदे मिळू शकतात.

दांडिया नृत्याचे आरोग्यदायी फायदे

तसं पाहिलं तर हातात दोन काठ्या घेऊन गोल गोल फिरणारे हे दांडिया नृत्य खूप लोकप्रिय आहे. दांडिया खेळताना भरपूर ऊर्जा लागते. दमदार ट्यून आणि ड्रम बीट्सवर केलेला दांडिया शरीरासाठी तसेच मनासाठी खूप फायदेशीर आहे. दांडिया खेळताना संपूर्ण शरीर सक्रिय राहते. यामध्ये जोडीदाराबरोबर पुढे-मागे फिरावे लागते आणि त्यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन कमी होते. एक तास दांडिया (Dandiya) खेळल्याने तुमच्या अनेक कॅलरीज बर्न होतात.

लवचिकता वाढते

दांडिया खेळताना शरीराची सर्व बाजूंनी हालचाल होते. हात पायांच्या क्रिया सर्व दिशेने फिरतात आणि दांडियाच्या काठ्या पकडण्यासाठी देखील हातांना खूप मेहनत करावी लागते. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची लवचिकता अधिक वाढते.

श्वासोच्छवासाची शक्ती मजबूत होते

दांडिया खेळताना व्यक्ती सतत डान्सिंग मोडमध्ये असते. यामुळे आपली फुफ्फुसे अधिक वेगाने काम करतात आणि श्वासोच्छवासाची शक्ती मजबूत करते. याशिवाय दांडिया खेळल्याने हृदयही मजबूत राहते कारण या काळात शरीर पूर्णपणे सक्रिय राहावे लागते.

फोकस वाढतो

दांडिया हा एक असा नृत्याचा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला त्याच्या ग्रुप आणि पार्टनरच्या हालचालींवर जास्त लक्ष द्यावं लागतं. दांडिया खेळण्यासाठी एकाग्रता ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे या नवरात्रीत तुम्ही देखील दांडिया खेळणार असाल तर त्याचे फायदे आधीच जाणून घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2IlRHnF Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : या नवरात्रीत मनसोक्त खेळा दांडिया; वजन कमी करण्याबरोबरच तुम्हाला मिळतील 'हे' जबरदस्त फायदेhttps://ift.tt/gGQFlcN
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : या नवरात्रीत मनसोक्त खेळा दांडिया; वजन कमी करण्याबरोबरच तुम्हाला मिळतील 'हे' जबरदस्त फायदेhttps://ift.tt/gGQFlcN