Advertisement

Skin Care Tips : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असतं. मात्र, वाढत्या वयानुसार खरंच आपण आपल्या त्वचेची काळजी <a href="https://ift.tt/nv7xr1I Care Tips) घेतो का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. कारण वयाच्या तिशीनंतर आपली त्वचा निस्तेच होऊ लागते. यासाठी योग्य वेळेस त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बदलतं हवामान, धुम्रपान, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि ताणतणाव यांमुळे आपल्या त्वचेवर लवकर वृद्धत्व दिसू लागते, ज्यासाठी आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

कोरडेपणा, बारीक रेषा, सुरकुत्या, निस्तेज त्वचा आणि काळे डाग ही वृद्धत्वाची काही लक्षणे आहेत. अशा वेळी या लक्षणांकडे वेळीच दुर्लक्ष करू नका आणि त्वचेची पूर्ण काळजी घ्या. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेला वृद्धत्वापासून वाचवू शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.

अँटी एजिंग फेस पॅक घरीच बनवा

पपई फेस पॅक

पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही एक कप पिकलेली पपई घ्या आणि त्याची बारीक पेस् करा. आता त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. मास्क पूर्णपणे कोरडे होईपर्यंत 30 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

दही फेस पॅक

दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि चिमूटभर हळद घ्यावी लागेल. आता हे मिश्रण एकत्र करा. या सर्वांची जाडसर पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

अंडी आणि कोरफड फेसपॅक

एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या. आता त्यात एलोवेरा जेल टाका आणि मिक्स करून स्मूद पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या मानेवर आणि चेहऱ्यावर लावा आणि किमान 40 मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर पाण्याने धुवा आणि चेहरा कोरडा करा. तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर दर दोन दिवसांनी हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/JirYB1Q Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : वयाच्या तिशीतच त्वचेवर वृद्धत्व दिसतंय? दिर्घकाळासाठी सुंदर आणि तरूण दिसायचं असेल 'हे' 3 घरगुती फेस पॅक वापराhttps://ift.tt/pxisAPf
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : वयाच्या तिशीतच त्वचेवर वृद्धत्व दिसतंय? दिर्घकाळासाठी सुंदर आणि तरूण दिसायचं असेल 'हे' 3 घरगुती फेस पॅक वापराhttps://ift.tt/pxisAPf