Advertisement

<a href="https://ift.tt/x3IhVgk Education Minister : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) सरकार आल्यापासून महिलांवर (Women) वेगवेगळे निर्बंध लादले जात आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अन्याय सुरु असून त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तालिबान सरकार महिलांना (Afghanistan Minister On Woman) दुय्यम स्थान देतं. आता पुन्हा एकदा तालिबान सरकारच्या शिक्षा मंत्र्यांनी महिलांबाबत वक्तव्य केलं आहे. तालिबान सरकारमधील शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम (Neda Mohammad Nadim) यांनी म्हटलं की, प्रकृतीच्या नियमानुसार, पुरुष महिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपण हे खोटं ठरवू शकत नाही.

तालिबानी शिक्षण मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील कार्यवाहक उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी रविवारी, 1 ऑक्टोबर रोजी महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इस्लामिक शरिया कायद्यानुसार स्त्री-पुरुष समान नाहीत, असं वक्तव्य बागलान विद्यापीठातील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी केलं आहे. काबुल न्यूज एजन्सी टोलोच्या वृत्तानुसार, नेदा मोहम्मद नदीम यांनी म्हटलं की, आम्ही महिलांशी संबंधित तालिबानी व्यवस्था नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

अफगानिस्तानमध्ये महिलांवर अन्यायपुरुषच श्रेष्ठ

तालिबान सरकारने महिलांच्या विरोधात उचललेल्या पावलांचे शिक्षण मंत्र्यांनी समर्थन केलं आहे. बैठकीत त्यांनी महिला आणि पुरुष समान नाहीत यामुद्द्यावर भर दिला. अल्लाहने स्त्री-पुरुषांमध्ये फरक केला आहे, असंही त्यांनी म्हटलं. नेदा मोहम्मद नदीम यांनी पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधताना म्हटलं की, पाश्चिमात्य देश स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार्ते आहेत, मात्र स्त्री-पुरुष दोघेही समान नाहीत. तालिबान सरकारने महिलांवर कठोर नियम लादले आहेत. महिलांचे शिक्षण, नोकरी यावर बंदी घालण्यासोबतच महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावरही मनाई आहे.

'महिलांना पुरुषांची गुलामी करावी लागेल'

अफगाणिस्तानचे शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी सांगितलं की, निसर्गाच्या नियमानुसार पुरुष महिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत. तर्काच्या आधारे आपण हे खोटं असल्याचं सिद्ध करू शकत नाही. पुरुष शासक आहेत, त्यामुळे पुरुष स्त्रियांवर अधिकार गाजवू शकतात, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुरुषाने दिलेले आदेश स्त्रीने पाळले पाहिजेत आणि स्त्रियांनी त्यांच्या अधीन रहायला हवं. महिलांनी पुरुषांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे.

'विज्ञान विषय महिलांसाठी योग्य नाही'

तालिबान सरकारने नियुक्त केलेल्या मंत्र्याने विज्ञान विषय महिलांसाठी योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. यावेळी विद्यापीठांमध्ये शिकवले जाणारे हे विषय इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात, असा युक्तिवादही शिक्षण मंत्र्यांनी केला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

'या' देशात ब्युटी पार्लरवर बंदी! हजारो सलूनला टाळं, सरकारनं महिलांपासून सजण्याचं स्वातंत्र्यही हिरावलं

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Taliban : महिलांपेक्षा पुरुषच श्रेष्ठ, महिलांना पुरुषांची गुलामी करावी लागेल, तालिबानी मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; अफगानिस्तानमध्ये महिलांवर अन्यायhttps://ift.tt/a1o9tTn
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Taliban : महिलांपेक्षा पुरुषच श्रेष्ठ, महिलांना पुरुषांची गुलामी करावी लागेल, तालिबानी मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; अफगानिस्तानमध्ये महिलांवर अन्यायhttps://ift.tt/a1o9tTn