Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ मार्च, २०२१, मार्च २२, २०२१ WIB
Last Updated 2021-03-22T04:47:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC Exam 2020: 'सी-सॅट'चा पेपर अवघड; परीक्षा सुरळीत Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा पुण्यासह राज्यात रविवारी सुरळीत पार पडली. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या, पार्श्वभूमीवर परीक्षेला साधारण सात हजार विद्यार्थी अनुपस्थित राहिले. उपस्थित विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान सुरक्षित अंतराचे नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना 'सी-सॅट'चा पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुंबईत ही परीक्षा ५१ केंद्रांवर घेण्यात आली. त्यापैकी अनेक केंद्रांवर करोनाच्या पार्श्वभूमीमुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गैरहजर होते, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. राज्यसेवा पूर्व परीक्षा साधारण २०० जागांसाठी घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून दोन लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुण्यात ७७ परीक्षा केंद्रावर सुमारे ३१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. परीक्षेच्या वेळेच्या आधी दीड तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रात प्रवेश देताना सॅनिटायझर, हॅँडग्लोव्ह्ज व मास्क असे लहान किट उमेदवारांना देण्यात आले. प्रत्येकाची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे करोनाची लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीपीई किट देण्याची; तसेच त्यांची स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था करण्यात आली होती. करोना संबंधित नियमांचे पालन करून बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत उमेदवारांनी परीक्षा दिली. पहिला पेपर १०० प्रश्‍नांचा आणि २०० गुणांचा होता. दुसरा पेपर 'सी-सॅट' ८० प्रश्‍नांचा आणि २०० गुणांचा होता. 'सी-सॅट'च्या प्रश्‍नपत्रिकांच्या पृष्ठांची संख्या ६३ होती. अशा परिस्थितीत परिच्छेदातील सर्व मजकूर वाचून उत्तरे लिहिण्यात बराच वेळ गेला. सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यास वेळ कमी पडत होता. 'सी-सॅट'मधील बहुतांश प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ गेला, तर काही प्रश्न किचकट होते. त्यामुळे या पेपरची काठिण्यपातळी थोडी अधिक होती, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. .करोनाच्या पार्श्‍वभूमीवर करोनाचे लक्षणे दिसून येणाऱ्या उमेदवारांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासोबतच खबरदारी म्हणून राज्य सेवा पूर्व परीक्षेत करोना विषाणूच्या संशयित उमेदवारांची स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात आली होती. अहिल्यादेवी प्रशाला येथे एक उमेदवार पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्याला प्रशासनाकडून पीपीई कीट दिले होते. ते परिधान करून उमेदवाराने परीक्षा दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पुणे जिल्ह्याची स्थिती परीक्षा केंद्रे : ७७ नोंदणी केलेले परीक्षार्थी : ३१,००० परीक्षा दिलेले विद्यार्थी : २४,२०२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/393J6Lh
via nmkadda