Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २५ मे, २०२१, मे २५, २०२१ WIB
Last Updated 2021-05-25T11:47:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यदलात भरतीची संधी Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: भारतीय सैन्यात (Indian Army) दाखल होऊन देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन आर्मीने महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी लॉ ग्रॅज्युएट शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) कोर्ससाठी २७ व्या JAG Entery Scheme चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज ४ जून किंवा त्यापूर्वी भरू शकतात. या भरती अभियानाच्या माध्यमातून सैन्यात पुरुष आणि महिलांना १४ वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळणार आहे. म्हणजेच सुरुवातीला १० वर्षांसाठी आणि त्यानंतर ४ वर्षांची मुदतवाढ मिळेल. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करा. सैन्य भरती २०२१ साठी पदांची माहिती पुरुष उमेदवारांसाठी - ६ पदे महिला उमेदवारांसाठी - २ पदे पदांची एकूण संख्या - ८ पदे पात्रता काय? उमेदवार बार काऊन्सिल ऑफ इंडियाद्वारा मान्यता प्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह एलएलबी डिग्री (ग्रॅज्युएशन की डिग्री नंतर तीन वर्षांचा प्रोफेशनल कोर्स किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स) उमेदवारांना बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा राज्त वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ जुलै २०२१ रोजी किमान २१ आणि कमाल २७ वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hTco4C
via nmkadda