Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २० मे, २०२१, मे २०, २०२१ WIB
Last Updated 2021-05-20T15:47:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JAM 2021: IITs आणि IISc मधील प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ Rojgar News

Advertisement
Registration: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरूने (JAM) च्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप JAM 2021 साठी अर्ज केलेला नाही ते आता २७ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आयआयएससीच्या JOAPS पोर्टल वर जावे. यापूर्वी या अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २० मे २०२१ होती, ती वाढवण्यात आली आहे. JAM काय आहे? जेएएम (JAM) एन्ट्रन्स एक्झाम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेएएम फॉर्ममध्ये आपल्या पसंतीचे इन्स्टिट्यूट आणि अभ्यासक्रम नोंदवायचा असतो. परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आयआयटी आणि आयआयएससीमधील एमएससी, जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी पीएचडी ड्युअल डिग्री आणि अन्य अभ्यासक्रमांच्या प्रोव्हिजनल अॅडमिशनसाठी अर्ज करू शकतात. JAM 2021 Result कधी? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मध्ये मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी JAM प्रवेश परीक्षा द्यावी लागते. JAM 2021 १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. याचा निकाल २० मार्च रोजी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण १४,७२५ विद्यार्थ्यांनी कट ऑफ गुणांपेक्षा अधिक गुण मिळवले. प्रवेश वेळापत्रक जेएएम 2021 च्या वेळापत्रकानुसार तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिली यादी १८ जून रोजी तर दुसरी १ जुलै रोजी जाहीर होणार आहे. तिसरी यादी १६ जुलै २०२१ रोजी जारी केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काऊन्सिलिंगसाठी उपस्थित राहावे लागेल. प्रवेश प्रक्रिया २० जुलै रोजी संपेल. JAM 2021 Registration: कसा करायचा अर्ज? जाणून घ्या... १: अधिकृत वेबसाइट - jam.iisc.ac.in किंवा joaps.iisc.ac.in वर जा २: होमपेज वर JAM अॅडमिशन फॉर्म वर क्लिक करा ३: आवश्यक माहिती भरून लॉग इन करा ४: वैयक्तिक तपशील आणि पसंतीक्रम नोंदवून आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करा ५: अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमीट करा ६: फॉर्म रिसीप्टचे प्रिंट आउट घेऊन सुरक्षित ठेवा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v4sdZO
via nmkadda