'सीएस' च्या नोंदणीसाठी यंदापुरती मिळणार 'ही' सवलत Rojgar News

'सीएस' च्या नोंदणीसाठी यंदापुरती मिळणार 'ही' सवलत Rojgar News

CS June Exam 2021: द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून () जून २०२१मध्ये आयोजित होणारी ‘सीएस’ (CS) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन संपणार आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन पुढील परीक्षेपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागणार नसल्याचे ‘आयसीएसआय’मार्फत जाहीर करण्यात आले आहे. ‘आयसीएसआय’मार्फत सीएस एक्झिक्युटीव्ह आणि सीएस फायनल या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांमार्फत रजिस्ट्रेशन केले जाते. ते पाच वर्षे किंवा पाच संधींपर्यंत ग्राह्य धरले जाते. या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतरच त्यांना परीक्षेच्या पुढील संधीचा लाभ घेता येतो. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या ‘सीएस’ अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत यंदा या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसल्याचे ‘आयसीएसआय’ने स्पष्ट केले आहे. सीएस अभ्यासक्रमांच्या जून २०२१मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांना जुन्या नोंदणीवरच परीक्षा देता येणार आहे. ही सुविधा फक्त जून २०२१मधील पुढे ढकललेल्या परीक्षांपुरतीच लागू राहणार असल्याचे ‘आयसीएसआय’ने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g3nPEm
via nmkadda

0 Response to "'सीएस' च्या नोंदणीसाठी यंदापुरती मिळणार 'ही' सवलत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel