केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची रविवारी बैठक; बारावी आणि अन्य परीक्षांवर होणार चर्चा Rojgar News

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची रविवारी बैठक; बारावी आणि अन्य परीक्षांवर होणार चर्चा Rojgar News

2021: केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Education Minister ‘Nishank') यांनी रविवारी २३ मे २०२१ रोजी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत बारावी बोर्ड आणि अन्य प्रवेश परीक्षांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. देशभरच्या सर्व राज्यांतील आणि केंद्र शासित प्रदेशांतील शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्यातील परीक्षा मंडळांचे अध्यक्ष आणि संबंधित घटकांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही व्हर्च्युअल मीटिंग उद्या दुपारी २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असणार आहेत. या संबंधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एक ट्विट देखील केले आहे. यानुसार, राज्य सरकारच्या सर्व शिक्षणमंत्र्यांना आणि सचिवांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी आणि आगामी परीक्षांसंबंधी आपली मते, विचार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्‍यक्षतेखाली या विषयावर बैठक झाली होती, ज्यात पोखरियाल यांनी सर्व राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यावेळी देखील सर्व राज्यांचे सचिव सहभागी झाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fSKl2H
via nmkadda

0 Response to "केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची रविवारी बैठक; बारावी आणि अन्य परीक्षांवर होणार चर्चा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel