बारावी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवरील SC तील सुनावणी आता सोमवारी Rojgar News

बारावी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवरील SC तील सुनावणी आता सोमवारी Rojgar News

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. सकाळी या सुनावणीला सुरूवात झाली, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सुनावणी सोमवारी ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वकील ममता शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीएसई बोर्डाने १४ एप्रिल रोजी दहावी परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी २८ मे रोजी सुनावणी होणार होती. सकाळी सुनावणीला सुरुवात झाली, मात्र विरोधी पक्षांना याचिकेची अॅडव्हान्स्ड कॉपी दिलेली नाही असं कोर्टाच्या लक्षात आल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने यावेळी अशीही टिप्पणी केली की १ जूनला केंद्र सरकार या परीक्षांबाबतच्या ठोस निर्णयाप्रत येणार असल्याचेही कळले आहे. दरम्यान, सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षांमुळे टांगणीला लागलं आहे. याचिकेत काय मागणी? सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत असं म्हटलं आहे की करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीत बारावीच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. परीक्षा विलंबाने घेतल्या तर निकालासही विलंब होणार, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर होणार. त्यामुळे परीक्षा रद्द कराव्यात आणि मूल्यांकनाची एक सामायिक पद्धत ठरवावी, जेणेकरून लवकरात लवकर निकाल लावता येतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SDFl9R
via nmkadda

0 Response to "बारावी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवरील SC तील सुनावणी आता सोमवारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel