Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २४ जून, २०२१, जून २४, २०२१ WIB
Last Updated 2021-06-24T08:47:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Board Exams,JEE,NEET2021:शिक्षणमंत्री पोखरियाल देणार सर्व प्रश्नांची उत्तरे Rojgar News

Advertisement
Board Exams, , :केंद्रीय रमेश पोखरीयल हे २५ जूनला संध्याकाळी ४ वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन लाईव्ह येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निकालाची तारीख पोखरियाल जाहीर करतील अशी शक्यता आहे. तसेच कॉलेज आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षांबद्दल देखील ते बोलण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतरांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी चर्चेदरम्यान देणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. कोणाला काही शंका विचारायची असल्यास त्यांनी शिक्षणमंत्रालयाच्या ट्विटर हॅंडलवर पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात पोखरीयाल यांनी विद्यार्थ्यांना संदेश लिहिला आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमच्याकडून असंख्य मेसेज आणि माहिती येत आहे. तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी देखील व्यक्त केली. याबद्दल धन्यवाद. मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. असे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले. संवादाच्या वेळी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर भागधारकांकडून प्रश्न विचारतील असे मंत्री म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांकडे क्वेरी आहे ते शिक्षण मंत्रालयाच्या वैयक्तिक ट्विटर आणि फेसबुक हँडल्स आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत हँडलवर पाठवू शकतात. पोखरीयाल, विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, “प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमचे अनेक संदेश आणि माहिती सतत मिळत आहे. तसेच, माझ्या आरोग्याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि असे सांगू इच्छितो की आता मी स्वस्थ आहे. " करोनाची लक्षणे आढळल्याने पोखरीयाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमच्या अनेक शंका तुम्ही मेसेजद्वारे विचारलात पण तब्येतीवर उपचार सुरु असल्या कारणाने मी कोणाला उत्तर देऊ शकलो नाही. पण तुम्हाला सीबीएसईबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही ट्वीटर, फेसबुक आणि मेलच्या माध्यमातून विचारु शकता असेही ते म्हणाले. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून मंडळाने दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या निकालांच्या योजना देखील जाहीर केल्या आहेत. सध्या सीबीएसईने निश्चित केलेल्या पोर्टलमध्ये शाळा विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करीत आहेत आणि दोन्ही परीक्षांचे निकाल जुलैमध्ये अपेक्षित आहेत. तरीही खासगी माध्यमातून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची परीक्षा, रीपीटर विद्यार्थी आणि कंपार्टमेंटच्या परीक्षांविषयी अनिश्चितता असल्याचे ते म्हणाले. मुख्य प्रलंबित सत्र सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आले. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत सूचनेची वाट पाहिली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंजिनियरिंग परीक्षा ऑगस्टमध्ये आणि २५ दिवसांच्या आत दुसरे सत्र घेण्यात येईल. एनईईटी २०२१ इच्छुक उमेदवार अद्याप अर्जांच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्टमध्ये ही परीक्षा होणे हे शक्य नाही. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही परीक्षा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. शिक्षणमंत्री हे या सर्व विषयांवर काय भाष्य करणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U2fNE3
via nmkadda