बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा,सुप्रीम कोर्टाचे राज्य बोर्डांना आदेश Rojgar News

बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा,सुप्रीम कोर्टाचे राज्य बोर्डांना आदेश Rojgar News

Declare:अनेक राज्य बोर्डांनी आपल्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अशात ३१ जुलैपर्यंत बारावीचे निकाल लावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य बोर्डांना दिले आहेत. ज्या राज्यांकडे अजून अंतर्गत मूल्यांकन पद्धत तयार नाहीय त्यांना १० दिवसांचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बारावीचे मूल्यांकन हे दहावी आणि अकरावीच्या निकालाच्या आधारे होईल असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. बारावीचे गुण हे मागच्या परीक्षांच्या आधारे दिले जातील तसेच ३१ जुलैपर्यंत रिझल्टची घोषणा केली जाईल असेही सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ४० टक्के गुण हे प्रीबोर्ड आधारे असतील तर दहावी आणि अकरावी परीक्षांना ३०-३० टक्के गुण दिले जातील असे सीबीएसईने बारावीचे मुल्यांकन पद्धत न्यायालयात सादर करताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयान आता सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत रिझल्टची घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. पण सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) नंतर काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (ISCE)ने देखील याआधीच ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. ICSE चे म्हणणे आहे की, रिझल्टची घोषणा २० जुलैऐवजी ३१ जुलैच्या आधीच होईल.आयसीएसी रिझल्ट २०२१ (CISCE ISC Result 2021) रिझल्ट तयार करताना बारावीसोबतच अकरावीचे अंतर्गत गुण जोडले जाऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SpbbaT
via nmkadda

0 Response to "बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा,सुप्रीम कोर्टाचे राज्य बोर्डांना आदेश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel