Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २१ जून, २०२१, जून २१, २०२१ WIB
Last Updated 2021-06-21T11:47:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CA July Exam 2021 सीए परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Admit Card: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाऊंडेशन, इंटरमीडिएट, फायनलच्या जुलै महिन्यातील परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. संस्थेद्वारे सीए परीक्षांच्या अॅडमिट कार्डसंबंधी अपडेट संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, 'कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्राची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही. उमेदवारांना आपले अॅडमिट कार्ड संस्थेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. फायनल आणि इंटरमीडिएट कोर्सची सीए परीक्षा २०२१ चे आयोजन ५ आणि ६ जुलै रोजी केले जाणार आहे. सीए एडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट, वर जारी केले जाणार आहेत. विद्यार्थी आपल्या लॉगइन क्रिडेंशियलच्या माध्यमातून प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइट, icaiexam.icai.org वर जावे लागेल. यानंतर होमपेज पर उपलब्ध लॉगइन सेक्शनमध्ये आपला लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करावे. आता अॅडमिट कार्ड लिंक वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल. ते डाऊनलोड करा आणि प्रिंट आउट घेऊन सुरक्षित ठेवा. ICAI CA फायनल आणि CA इंटरमीडिएट कार्यक्रमांसाठी जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थी ५ जुलैपर्यंत परीक्षा देऊ शकतात. इंश्यूरन्स रिस्क मॅनेजमेंट(IRM) टेक्निक परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कराधान सहित योग्यतेनंतर अभ्यासक्रमासाठी (PQC) साठी असेसमेंट टेस्ट (INTT–AT) देखील ५ जुलैपासून सुरु होईल. दरम्यान, आयसीएआयने विद्यार्थ्यांना ऑप्ट-आउटचा पर्यायही दिला आहे. जे विद्यार्थी जुलैमधील सीए परीक्षा महामारीमुळे ऑगस्टमध्ये देऊ इच्छितात, ते ऑप्ट आऊटसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wM8IWL
via nmkadda