Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ३० जून, २०२१, जून ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-06-30T11:47:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पुढच्या वर्षी दहावी, बारावी मूल्यांकन कसे होणार? CBSEकडून प्लान जाहीर Rojgar News

Advertisement
Board Exams 2022: करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे (Covid 2nd Wave)यावर्षी देखील सर्वच बोर्ड परीक्षा रद्द कराव्या लागल्या. ऐनवेळी विना परीक्षा मूल्यांकन पद्धत ( Marks Formula) वापरावी लागली. पण या पद्धतीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पूर्णपणे सहमत असलेले दिसत नाहीत. आता करनोच्या तिसऱ्या लाटेची (Covid 3rd Wave) शक्यता वर्तवली जातेय. पुढच्या वर्षी देखील करोनाचा प्रादुर्भाव दिसेल असं म्हटलं जातंय. अशावेळी बोर्ड परीक्षांवर पुन्हा टांगती तलवार आहे. म्हणून यावर्षातून धडा घेत सीबीएसईने पुढच्यावर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षांची (CBSE 2022) तयारी आतापासून सुरु केली आहे. यावर्षी सीबीएसईने आधीच्या इयत्तांवरुन गुणांचे मूल्यमापन केले. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्ड (CBSE Pre Board)च्या परफॉर्मन्सच्या आधारे गुण दिले जात आहेत. पुढच्यावर्षी देखील इंटरनल असेसमेंटला बोर्ड परीक्षेच्या मार्किंग पॉलिसीचा प्रमुख भाग बनवण्यात येणार आहे. पण याची पद्धत थोडी वेगळी असणार आहे. सीबीएसई परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज (CBSE Sanyam Bharadwaj)स्वत: याबद्दल माहिती दिली. आम्ही सीबीएसई असेसमेंटनुसार पॉलिसी २०२१ ला २०२२(CBSE Assessment Policy 2022) मध्ये देखील कायम ठेवणार आहोत. यावर्षी आम्ही वर्गातील इतर गुणांनादेखील विद्यार्थ्यांच्या असेसमेंटमध्ये घेणार आहोत असे भारद्वाज म्हणाले. पण २०२२ मध्ये आम्ही दहावी आणि बारावी इंटरनल असेसमेंट (CBSE Internal Assessment 2022) अशा पद्धतीने आणू की, सर्व देशात यासंदर्भात एकसमानता, पारदर्शकता असेल. त्यामुळे गरज पडल्यास असेसमेंटच्या आधारे रिझल्ट (CBSE Results 2022)(CBSE Results 2022) लावला जाऊ शकेल असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका शाळांमार्फत वेळोवेळी बोर्डाला पाठवली जाईल. परिस्थिती अनुकूल नसल्यास परीक्षा रद्द करावी लागली तर या असेसमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीचा निकाल लावला जाऊ शकतो. यामुळे मागच्या इयत्तांना जोडण्याची आवश्यकता भासणार नाही असे परीक्षा नियंत्रक म्हणाले. यासाठी युनिट टेस्ट, सहामाही आणि वार्षिक परीक्षा आणि प्री-बोर्ड परीक्षांचे महत्व वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण होणारी प्रत्येक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे. तरीही विद्यार्थ्यांवर जास्त ताण पडू नये असाच अभ्यासक्रम असेल असेही भारद्वाज यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qy4xf2
via nmkadda