Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ जून, २०२१, जून २८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-28T14:47:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यावर्षी IITमधून करा MTechचे 'हे' नवे कोर्स, इथे पाहा लिस्ट Rojgar News

Advertisement
IIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT)ने शैक्षणिक वर्षे २०२१-२२ साठी विविध कोर्स सुरु केले आहेत. टेक्नोलॉजीपासून पब्लिक पॉलिसी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत अनेक कोर्स आहेत. करोना प्रादुर्भावामुळे काही संस्थांनी ऑनलाइन कोर्स सुरु केले आहेत. हे कोर्स केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रोफेशनल्स व्यक्तींसाठी देखील काही कोर्स आहेत. मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी(MPP) - IIT दिल्ली आयआयटी दिल्लीने सायन्स, टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन (STI) आणि डेव्हलपमेंटवर लक्ष देण्यासाठी अॅकेडेमिक सेशन(२०२१-२२) मध्ये पदव्युत्तर प्रोग्रामसाठी मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी (MPP)सुरु करणार आहे. स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी (SPP)च्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. एमबीबीएस, बीए एलएलबी (ऑनर्स), बीएआरच, बीटेक, बीएससी (Ag), बीव्हीएससी आणि एमए, एमएससी, एमफिल, इंटीग्रेटेड एमएससी / एमए, एमटेकमध्ये पदव्युत्तर कोर्स करु शकता. ऑनलाइन (MTech)आणि (MDes) प्रोग्राम - IIT हैदराबाद आयआयटी हैदराबादने ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणाऱ्या वर्किंग प्रोफेशनल्ससाठी ७ ऑनलाईन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. एमटेकमध्ये या विषयात घ्या प्रवेश १) इंडस्ट्रीयल मेटालर्जी (industrial metallurgy) २) ईव्ही तंत्रज्ञान EV technology) ३) कम्प्यूटेशनल मेकॅनिक्स, इंटिग्रेटेड कम्प्यूटेशनल मटेरियल इंजीनियरिंग, कम्युनिकेशन अँड सिग्नल प्रोसेसिंग (CSP) ४) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर सिस्टम (PEPS) ५)मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स व व्हीएलएसआय (ME & VLSI) ई-मास्टर्स प्रोग्राम - आयआयटी कानपूर आयआयटी रुडकीने डिझाइन केलेल्या नव्या विभाग (DOD)ची स्थापना केली आहे. यामध्ये मास्टर इन डिझाइन (industrial design) आणि मास्टर इन इनोव्हेशन मॅनेजमेंट (MIM)हे दोन पदव्युत्तर कोर्स सुरु आहेत. एनर्जी इंजिनिअरिंग इन बीटेक - आयटी दिल्ली आयआयटी दिल्लीमध्ये सेंटर फॉर एनर्जी स्टडीज (CES)हा कोर्स उर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात परिवर्तीत केला जाणार आहे. याच्या विस्तारित भागात नवे कोर्स सुरु केले जाणार आहेत. सध्या सेंटर फॉर एनर्जी स्टडीजने ऑफर केलेले तीन कोर्स वेगवेगळ्या देशातील काम करुन शिकणाऱ्याांसाठी अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम म्हणजे BTech इन एनर्जी इंजीनियरिंग करता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qwzYWT
via nmkadda