खासदार अमोल कोल्हे करणार 'छत्रपतींचा' अभ्यास Rojgar News

खासदार अमोल कोल्हे करणार 'छत्रपतींचा' अभ्यास Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले ाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी' या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमासाठी खासदार डॉ. प्रवेश घेणार आहेत. कोल्हे यांनी शुक्रवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असल्याचे सांगितले. विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य; तसेच युद्धनितीवर आधारित पदव्युत्तर पदविकेचा (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स) अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. त्याचवेळी 'या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला आवडेल,' असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी डॉ. कोल्हे यांनी विद्यापीठात कुलगुरूंची भेट घेऊन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असल्याचे जाहीर केले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. 'छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी' हा एक वर्षाचा कोर्स एकूण ८०० गुण आणि ३२ क्रेडिटचा असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्रात चार विषय, अशा एकूण आठ विषयांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर आधारित शोधनिबंधाचाही समावेश आहे. प्रत्येक विषयासाठी शंभर गुण आणि चार क्रेडिट देण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सुरू झाली असून, विद्यापीठाच्या वेबसाइटवर त्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांसारखे महाराजांच्या चरित्राचे जाणकार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला मनस्वी आनंद आहे. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xUcvBt
via nmkadda

0 Response to "खासदार अमोल कोल्हे करणार 'छत्रपतींचा' अभ्यास Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel