Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २६ जून, २०२१, जून २६, २०२१ WIB
Last Updated 2021-06-26T05:47:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOUचा डेव्हलपमेंट कम्युनिकेशनमध्ये पीजी डिप्लोमा, असा घ्या प्रवेश Rojgar News

Advertisement
Development Communication: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (IGNOU)मध्ये जुलै २०२१ पासून विकास संचारमध्ये (PGDDC)नवा पदव्युत्तर डिप्लोमा सुरु करण्यात आला आहे. स्कूल ऑफ जर्नलिझम अॅण्ड न्यू मीडिया स्टडीजने सुरु केलेल्या शैक्षणिक प्रोग्रामचे उद्घाटने कुलगुरु प्रोफेसर नागेश्वर राव यांनी केले. PGDDC मार्फत विकास प्रक्रियेच्या मूळ प्रक्रियेबद्दल चांगली समज विकसित केली जात आहे. यामुळे विविध स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीमध्ये रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. नव्या शैक्षणिक कार्यक्रमाचा कालावधी १ वर्षाचा आहे. पदवी घेतलेले विद्यार्थी विकास डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र असतील. विद्यार्थ्यांना PGDDC मध्ये अर्ज करण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईट ignouadmission.samarth.edu.inवर जावे लागेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा कोर्सेसचा शुभारंभ करताना विकास संचार आणि अनुसंधानचे विशेषज्ञ प्राध्यापक जे.एस यादव (माजी निदेशक IIMC)यांनी भारतासारख्या विकासशील देशात अशा कोर्सचे महत्व अधोरेखीत केले. हा कोर्स खूप वेगळा आणि नाविण्यपूर्ण आहे. तसेच हा कोर्स करणाऱ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. ज्योतिषशास्त्राचा कोर्स यासोबतच इग्नूने एस्ट्रॉलॉजी इन मास्टर प्रोग्राम कोर्स (Masters Programme In Astrology)लॉन्च केला आहे. इग्नूने या संबंधात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्योतिष शास्त्राच्या (Astrology Course) विविध शाखांबद्दल प्रॅक्टीकल शिक्षण देणे हा या कोर्सचा हेतू आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. अभ्यासक्रमाची भाषा हिंदी असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gSRDoB
via nmkadda