Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ४ जून, २०२१, जून ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-06-04T13:47:53Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC SI ASI PET PST 2019 स्टाफ सिलेक्शनच्या पोलीस भरती शारिरिक चाचणीचा निकाल जारी Rojgar News

Advertisement
SI ASI PET PST Result 2019: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ने दिल्ली पोलिसातील सब-इन्स्पेक्टर, CAPFs आणि CISF मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदांसाठी झालेल्या शारीरिक चाचणीचा (फिजिकल एंड्योरेंस टेस्ट (PET) / फिजिकल स्टँडर्ड टेस्ट - PST) चा निकाल जारी केला आहे. ज्या उमदेवारांनी ही परीक्षा दिली होती ते SSC SPO PET निकाल अधिकृत वेबसाइट - तून डाउनलोड करू शकतात. SSC SI ASI PET PST निकालाची लिंक पुढे देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून SSC SI फिजिकल निकाल डाउनलोड करता येईल. SSC SI शारीरिक परीक्षा 2019 मध्ये एकूण ५,९५४ उमेदवार पात्र ठरले आहेत. हे उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. SSC CPO पेपर २ ची तारीख आणि अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाईल. अधिकृत नोटिसनुसार, SSC SI PET परीक्षेला ४५९२३ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३०२१८ उमेदवार अनुपस्थित होते, ९७५१ परीक्षेला बसण्यास अपात्र ठरले तर ८३ उमेदवारांना शारीरिक परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. SSC SI ASI PET PST Result 2019: निकाल कसा पाहाल? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा स्टेप २- 'Result' लिंक वर क्लिक करा स्टेप ३- विचारलेली माहिती भरा स्टेप ४- रिजल्ट तुमच्या समोर असेल स्टेप ५- आता निकाल डाउनलोड करा स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट अवश्य घ्या. SSC CPO परीक्षा २३ नोव्हेंबर २०२० ते ८ डिसेंबर २०२० पर्यंत CAPFs च्या विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. SSC ने CAPFs परीक्षा 2019 च्या माध्यमातून दिल्ली पोलीस, CAPF आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या १५५७ पदांसाठी अर्ज मागवले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TLbqxn
via nmkadda