Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T06:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AIIMS INI CET Result 2021: एम्स पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
AIIMS INICET 2021: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नवी दिल्लीतर्फे पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) कोर्सेससाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आयएनआयसीईटी २०२१ रिझल्टची घोषणा केली आहे. एम्सद्वारे आयएनआयसीईटी रिझल्टची घोषणा परीक्षा पोर्टल aiimsexams.ac.in वर करण्यात आली. जे उमेदवार आयएनआयसीईटी २०२१ मध्ये सहभागी झाले होते ते निकालाची घोषणा झाल्यानंतर परीक्षा पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर जाऊन आपले गुण, स्कोअर, रॅंक याची माहिती घेऊ शकतात. एम्स दिल्लीने पीजी कोर्सेससाठी आयएनआयसीईटीचे आयोजन २२ जुलै २०२१ ला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन माध्यमातून केले होते. अंतिम जागांची घोषणा एम्स आयएनआयसीईटी २०२१ रिझल्टची घोषणा करण्याच्या आधी संस्थेतर्फे २१ जुलैला पीजी परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या अंतिम जागांची माहिती जाहीर केली होती. संस्थेने जाहीर केलेल्या नोटीसनुसार दिल्लीमध्ये एमडी/एमएस आणि एमडीएस कोर्सेससाठी २२७ सीट ठरल्या आहेत. तर एम्स भोपाळमध्ये एकूण ३५ जागा, एम्स भुवनेश्वरमध्ये एकूण ४६, एम्स जोधपूरमध्ये १०१, एम्स नागपूरमध्ये ३२, एम्स पटनामध्ये ६३, एम्स रायपूरमध्ये ५६, एम्स ऋषिकेशमध्ये १२, जिपमेर पुदुचेरीमध्ये १२४ सीट, निमहंस बंगळुरुमध्ये २५, पीजीआयएमईआर चंदीगढमध्ये १२५ सीट्सची घोषणा करण्यात आली आहे. या स्टेप्स फॉलो करुन एम्स आयएनआयसीईटी २०२१ रिझल्ट तपासा एम्स आयएनआयसीईटी २०२१ रिझल्ट तपासण्यासाठी उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर जावे लागेल. Important Announcement सेक्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा. यानंतर रिझल्ट पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होईल. उमेदवार यामध्ये आपल्या रोलनंबरच्या सहाय्याने निकाल तपासू शकतात. भविष्यातील उपयोगासाठी रिझल्टची प्रिंट काढून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iVvsOv
via nmkadda