
डॉ. मनोहर माने, डॉ. मोहन आमृळे शारीरिक शिक्षण विभाग शरीरसौष्ठत्व, विविध खेळ आणि त्यातील संधी, त्यासाठी भरविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नावलौकीक यासह आरोग्यदायी समाज घडविण्याचा हेतू समोर ठेऊन मुंबई विद्यापीठात २००५-०६ ला शारीरिक शिक्षण या विभागाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थीकेंद्रीत अध्ययन आणि अध्यापन तसेच या क्षेत्रातील व्यापक संशोधनाच्या माध्यमातून अल्पावधीतच या विभागाने उंची गाठली आहे. शारीरिक शिक्षण विभागामार्फत खालील अभ्यासक्रम राबविले जातात. पीएचडी इन फिजिकल एज्युकेशन, ३ वर्ष बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन (बी.पी.एड.), २ वर्ष मास्टर इन फिजिकल एज्युकेशन (एम.पी.एड.), २ वर्ष सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल फिटनेस ट्रेनिंग, ६ महिने सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस सेंटर मॅनेजमेंट, ६ महिने सर्टिफिकेट कोर्स इन योग फॉर टिचर ट्रेनिंग, ६ महिने बीपीएड व एमपीएड या अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाची केंद्रीय सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. सदर अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा व शारीरिक क्षमता कसोटीच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया घेतली जात असून नावनोंदणी ही केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन केली जाते. शाळा, कॉलेज, जिल्हा, राज्य, विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवरचे खेळातील सहभागाचे प्रमाणपत्र अनिवार्य असते. विभागात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांच्या सोयी-सुविधा विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रक, मॅपल फ्लोरिंगचे इनडोअर हॉल व आउटडोअर खेळाची मैदाने, जसे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबलटेनिस, टेनिस, बॅडमिंटन, हँडबॉल, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो-खो, इत्यादींसाठी उत्कृष्ट दर्जाची मैदाने उपलब्ध आहेत. मल्लखांब, योग, एरोबिक तसेच आधुनिक साधनांसह व्यायामशाळा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्लई, दिलीप वेंगसकर, अंजली भागवत, कावस बिलीमोरीया, अभिलाषा म्हात्रे, निलेश कुलकर्णी, आदिल सुमारीवाला, प्रवीण आमरे, भीष्मराज बाम यासारख्या दिग्गज व्यक्तींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन विभागामार्फत केले जाते. विद्यापीठातील सर्व विभागासाठी स्पोर्टिगो (इंटर डिपार्टमेंटल स्पोर्ट्स मिट) हे वर्षातून एकदा घेतली जाते. विभागातील अनेक विद्यार्थी हे महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. विभागातील अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा खेळातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विभागातून शारीरिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विभागाचे विद्यार्थी शाळेत क्रीडा शिक्षक तसेच महाविद्यालयामध्ये संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा म्हणून नेमणूक होऊ शकते. तसेच क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातही करिअरच्या विपुल संधींचे दालनही यानिमित्ताने उघड होत आहेत. यात अनेक शाखांमध्ये जसे ब्रँड एन्डोर्समेंट, स्पोर्ट्स टुरिझम, सेलिब्रेटी मॅनेजमेंट, फॅशन-गॅजेटचे प्रमोशन, मैदानी व्यवस्थापन आणि खेळासंबंधीच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. या विभागातील अनेक विद्यार्थी इतर राज्यांमध्ये व परदेशात शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. क्रीडा विभाग १० जून १९५६ रोजी मुंबई विद्यापीठात क्रीडा विभागाची स्थापना करण्यात आली. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये विद्यापीठ क्रीडा विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध ७२ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवितात. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेऊन विद्यापीठाचा प्रत्येक खेळाचा संघ निवडण्यात येतो. हा संघ पश्चिम विभागीय, अखिल भारतीय, खेलो इंडिया स्पर्धा व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात सहभागी होतात. महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धा सुरू झाल्यापासून सर्वात जास्त अजिंक्यपद हे मुंबई विद्यापीठाने पटकाविले आहेत. विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने विविध अखिल भारतीय व पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय स्पर्धा आयोजनासाठी महाविद्यालयांना स्पर्धानिहाय क्रीडा अनुदान दिले जाते. स्पर्धांमधील खेळाडू/ विद्यार्थ्यांना नियमानुसार अधिकचे दहा गुण आणि विद्यापीठस्तरीय खेळाडूंना नोकरी भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण हे विभागामार्फत प्रमाणपत्रे पडताळून दिले जाते. (लेखक अनुक्रमे मुंबई विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आणि संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण म्हणून कार्यरत आहेत.)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i4cKUj
via nmkadda
0 टिप्पण्या