Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T11:47:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा Rojgar News

Advertisement
() विभाग आणि सलंग्नित महाविद्यालयात पदवी आणि पदव्यूत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाच्या नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागामार्फत जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरांवर ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ५ जुलै ते ९ जुलै २०२१ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयांसाठी या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबई विद्यापीठामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेशपूर्व नावनोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जाते. तसेच मागील वर्षांपासून विद्यापीठ विभागातील पदव्यूत्तर प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीच्या प्रक्रीयेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता, स्थलांतर आणि अनुषंगिक इतर प्रशासकीय बाबींसंदर्भात महाविद्यालये व विद्यापीठ विभागांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागातील उपकुलसचिव आणि कर्मचारी वर्गासंह एमकेसीएलमधील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आणि पालघर जिल्ह्यांतील महाविद्यालयांसाठी या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी, पात्रता, परीक्षा अर्ज, स्थलांतर प्रमाणपत्र आणि इतर अनुषांगिक बाबींसाठी महाविद्यालयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एमकेसीएलमार्फत गुगलफॉर्म तयार करण्यात आला असून याद्वारे महाविद्यालये त्यांच्या समस्यांचे निराकरण करु शकतात. एखाद्या महाविद्यालयास शंका असल्यास त्यांनी एमकेसीएलमार्फत तयार केलेल्या गुगलफॉर्म भरून सादर केल्यास त्यांना तिकिट जनरेट करुन त्या तिकिट क्रमांकाच्या आधारे त्या महाविद्यालयाच्या शंकांचे त्वरीत निराकरण करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यशाळेत मुंबई परिक्षेत्रातील ३८९, ठाणे २५६, नवी मुंबई आणि रायगड १७८, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग १३४ आणि पालघर ९३ अशा एकूण १०३० महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4fEg2
via nmkadda