Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T05:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th, 12th Roll Number 2021: सीबीएसई दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर, या लिंकवरुन तपासा Rojgar News

Advertisement
CBSE 10th, 12th Roll Number 2021: दहावी रिझल्ट २०२१ आणि सीबीएसई बारावी रिझल्ट २०२१ ची वाट पाहणाऱ्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर केले आहेत. बोर्डाने (सीबीएसई) दहावी रोल नंबर २९ जुलैपासून अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान दहावी आणि बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देणयात आलेल्या लिंकवरुन आपले रोल नंबर तपासू शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. करोना प्रादुर्भावामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देखील देण्यात आले नाही. सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे. सीबीएसई दहावी आणि बारावी रिझल्ट केव्हा? सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि विविध राज्यातील बोर्डांना ३१ जुलै २०२१ पर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थीनींचे पालक सोशल मीडियावर रिझल्टची तारीख जाहीर करण्याची मागणी करत आहे. अशावेळी रिझल्ट लवकरच जाहीर होईल असे सीबीएसई बोर्डातर्फे २८ जुलै २०२१ ला सांगण्यात आले. तर दहावी आणि बारावीचे रोल नंबर तपासण्यासाठी पर्याय दिल्यानंतर आता निकाल देखील लवकरच लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता बोर्डातर्फे लवकरच कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून देखील रिझल्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lpFOJt
via nmkadda