Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T06:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 12th Result: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज Rojgar News

Advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोविड-१९ विषाणू महामारीमुळे यंदा बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. निकाल विशिष्ट सूत्रांच्या आधारे तयार करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ३० जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून पाहता येणार आहे. निकालाची वेबसाईट या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत. दरम्यान, तत्पूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर केले आहेत. बोर्डाने (सीबीएसई) दहावी रोल नंबर २९ जुलैपासून अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान दहावी आणि बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देणयात आलेल्या लिंकवरुन आपले रोल नंबर तपासू शकतात. सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे. अनोख्या पद्धतीने मीम टाकून निकालाची दिली माहिती सीबीएसई बोर्ड गेले दोन दिवस सोशल मिडियावर वेगवेगळे मीम्स पोस्ट करत आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करताना देखील बोर्डाने मीमचा आधार घेतला आहे. त्यामुळे या ट्विटला यूजर्सनीही तितकीच खोडसाळ उत्तरे दिली आहेत. यापूर्वी एका मीममध्ये सीबीएसईने अमेझॉन प्राइम वीडियो (Amazon Prime Video) वरील हिट शो फॅमिली मॅन (Family Man) चा संदर्भ दिला होता. फॅमिली मॅनमधील मुख्य पात्र श्रीकांत तिवारी (Shrikant Tiwari)म्हणजेच मनोज वाजपेयी आणि दुसरीकडे चेल्लम सर (Chellam Sir) म्हणजेच उदय महेश यांचे छायाचित्र वापरून हे गंमतीशीर मीम तयार करण्यात आले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WFxMSp
via nmkadda