TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE Result 2021 Dates: सीबीएसईतर्फे आज निकालाची घोषणा ? जाणून घ्या अपडेट Rojgar News

CBSE 10th, 12th Result 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (, CBSE) आज दहावी आणि बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार आणि सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० जुलैपर्यंत सीबीएसई दहावीच्या रिझल्टची घोषणा केली जाण्याची माहिती देण्यात आली होती. पण दहावीच्या टॅब्युलेशनमध्ये पॉलिसीला वेळ लागल्याने या निकालासाठी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागू शकते. सीबीएसई दहावी, बारावी रिझल्ट २०२१ संदर्भातील सर्व अपडेट अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वेबसाइटवर वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई दहावी रिझल्टची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पण बारावीच्या निकालासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. रिझल्ट तयार करण्याची पद्धत आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने रिझल्ट लावला जात आहे. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालसंदर्भातील घोषणा एक ते दोन दिवसात केली जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाची अपडेट एसएमएसच्या माध्यमातून पाठविली जाणार आहे. विद्यार्थी आपली गुणपत्रिका भारत सरकारच्या डिजिलॉकरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या मोबाइल नंबरच्या सहाय्याने इथे लॉगिन करावे लागेल. पहिल्यांदाच डिजिलॉकरवर जात असाल तर पिन किंवा पीआयएनने रिसेट करावे लागणार आहे. डिजिलॉकरमध्ये रिझल्ट सीबीएसई रिझल्ट २०२१ हा डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहे. डिजिलॉकर अकाऊंटमध्ये लॉगिन करुन विद्यार्थी मार्कशिट, मायग्रेशन सर्टिफिकेट्स आणि स्किल सर्टिफिकेटसारखे महत्वाचे डॉक्युमेंट हाताळू शकतात. विद्यार्थ्यांना कागदपत्र त्यांच्या संबंधित डिजिलॉकर अकाऊंटमध्ये पाठवले जातील. डिजिलॉकर हे डॉक्यूमेंट्सची साठवणूक, शेअरिंग आणि पडताळीसाठी सुरक्षित क्लाऊट आधारित प्लॅटफॉर्म आहे. डिजिलॉकर ही सुविधा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवता येतात. त्यामुळे कागदपत्रांचा अनावश्यक वापर टळतो. 'नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन'मार्फत ही सेवा पुरविण्यात येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3itf4ED
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या