Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जुलै, २०२१, जुलै २०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-20T07:45:01Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CSEET प्रवेश परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली! पाहा डिटेल्स Rojgar News

Advertisement
Date: सीएसईईटी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएसईईटी रिझल्ट २०२१ (CSEET Result 2021 Date)च्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. सीएस एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेचा निकाल २१ जुलै २०२१ ला जाहीर केला जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आपला निकाल २१ जुलैला दुपारी ३ वाजल्यापासून पाहता येणार आहे. ही प्रवेश परीक्षा १० जुलै आणि १२ जुलै रोजी घेण्यात आली होती. दोन्ही परीक्षांचे निकाल एकाच तारखेला आणि एकाच वेळी जाहीर होणार आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आयसीएसआय सीएसईटीची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर हा निकाल पाहता येणार आहे. उमेदवाराला विषयानुसार गुण पाहण्याची व्यवस्था संस्थेच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. सीएस कार्यकारी प्रवेश परीक्षाचा ऑपरचारिक ई निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटवर हा निकाल पाहू शकता किंवा भविष्यातील उपयोगासाठी डाऊनलोड करुन ठेवू शकता. सीएसईईटीतर्फे उमेदवारांना गुणपत्रिकेची प्रत दिली जाणार नाहीय. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृक वेबसाइट पाहणे गरजेचे आहे. ई रिझल्ट, गुणपत्रिका जाहीर नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएस एक्झिक्यूटीव्हमध्ये प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म ईरिझल्ट आणि गुणपत्रिकेच्या घोषणेनंतर अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर अपलोड केली जाणार आहे.फिजीकल रिझल्टची मूळ प्रत किंवा गुणपत्रिका हाती दिली जाणार नसल्याचे यातून स्पष्ट करण्यात आली आहे. इंस्टिट्यूटतर्फे CS जून परीक्षा स्थगित इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI)ने १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल पदांसाठी सीएस जून परीक्षा २०२१ चे आोजन करण्यात आले होते. त्यासह संस्थेने सीएस जून २०२१ साठी अर्ज करण्याची तारीखदेेखील वाढवली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UsvQf8
via nmkadda