Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जुलै, २०२१, जुलै २०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-20T06:45:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

BharatPeटेक्नॉलॉजी टीममध्ये भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
Recruitment2021: फायनान्शिअल टेक्नोलॉजी कंपनी BharatPeने या आर्थिक वर्षात टेक्नोलॉजी टीममध्ये भरती निघाली आहे. कंपनीनतर्फे शंभर जागा भरल्या जाणार आहेत. कॉमर्स अॅण्ड कंझ्युमर सेक्शनमध्ये कंपनीन अनेक उत्पादने आणणार आहे. टेक्नोलॉजी टीम तिप्पट केली जाणार असून यामध्ये शंभर पदं भरली जातील असे सांगण्यात आले आहे. भारत पे कंपनीने पगारामध्ये बदल करण्याच्या हेतून टेक्नोलॉजी टीममधील सदस्यांच्या मूल्यमापनाचे काम आठ महिने आधीच केले आहे. कंपनीने आपल्या टीमला इन्क्रीमेंट रुपात ७५ टक्के वाढ दिली आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार आहे. यामध्ये सीटीसी आणि कर्मचारी शेअर स्वामित्व योजनेच्या अंतर्गत वाढलेले शेअर्स देखील आहेत. सध्या टीममध्ये ६० कर्मचारी भारतपे चे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशनीर ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टेक्नॉलॉजीला पुढे नेणारी आर्थिक सेवा औद्योगिक संघटना आहे. कंपनी भारतात नव्या पिढीची बॅंकीग यंत्रणा बनवत आहे. आम्ही बाजारामध्ये उत्तम दर्जाचे उत्पादन करु इच्छितो आणि कौशल्य शिक्षण असलेल्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो असे ते म्हणाले. सध्या भारत पे हे सर्व UPI एप्ससाठी सिंगल इंटरफेस देते आणि व्यापाऱ्यांना भारत पे क्यूआर च्या माध्यमातून UPI सुविधा मोफत देण्यात येते. यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करणे सोपे जाते. गेल्या सहा महिन्यात कंपनीने १० कोटीहून अधिक सदस्यांसहीत देशातील सर्वात मोठी मल्टी-ब्रांड लॉयल्टी प्रोग्राम कंपनी, पेबॅक इंडियाची घोषणा केली. मोठ्या कंपन्यांमध्ये मेगा भरती करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने अर्थव्यवस्था कोलमडली असताना आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नोकऱ्या जाऊन बेरोजगार झालेल्यांची संख्या मोठी आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता तरुण वर्ग चिंतेत आहे. पण टेक्निकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. भारतात औद्योगिक सेवा पुरविणाऱ्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि विप्रोने यावर्षी शिक्षण संस्थांमध्ये कॅम्पसच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये टीसीएसच्या भारतातील कॅम्पसमध्ये ४० हजारून अधिक फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. तर विप्रोतर्फे यावर्षी ३० हजारहून अधिक अधिक ऑफर लेटर देण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VVlUuV
via nmkadda