TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE दहावी निकालाची प्रक्रिया पूर्ण; निकाल कधी, जाणून घ्या Rojgar News

2021 Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा या महिन्यात संपणार आहे. सीबीएसईने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी टॅब्युलेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. शाळांनी दिलेल्या मापदंडांनुसार त्यांनी विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाकडे जमा केले आहेत. एकदा अंतिम स्वरुप दिल्यावर निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर अपलोड केला जाईल. कधी जाहीर होणार दहावीचा निकाल? करोना व्हायरस (Covid-19) महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सीबीएसई १४ एप्रिल, २०२१ रोजी इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. १ मे २०२१ रोजी बोर्डाने मूल्यांकन पद्धती जाहीर केली होती. सीबीएसई बोर्डाच्या एका नोटीसनुसार, दहावीचा निकाल बोर्डाद्वारे १५ जुलै २०२१ पर्यंत जारी केला जाण्याची शक्यता आहे. दहावीची टॅब्युलेशन पॉलिसी काय आहे? सीबीएसई दहावी २०२१ निकालाच्या टॅब्युलेशन पॉलिसीनुसार, विद्यार्थ्यांना यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यापैकी २० टक्के सीबीएसईची जुनी मार्किंग स्कीम आणि उर्वरित ८० टक्के निकाल सीबीएसईच्या नव्या मार्किंग स्कीम द्वारे तयार केला जाईल . १५ जुलै पूर्वी देखील जाहीर होऊ शकतो निकाल बोर्डाने दहावी निकाल २०२१ जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. म्हणून अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे की बोर्ड १५ जुलै पूर्वी देखील निकाल जाहीर करू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी अद्ययावत माहितीसाठी cbse.gov.in ला नियमितपणे भेट देत राहावी. सीबीएसई दहावी कंपार्टमेंट परीक्षा २०२१ शाळांना मागील तीन वर्षांमधील शालांतर्गत कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुण मॉडरेट करण्याचादेखील सल्ला दिला आहे. जे विद्यार्थी बोर्डाच्या मापदंडानुसार गुण मिळवण्यात सक्षम नाहीत, त्यांना ग्रेस गुण देण्याच्या सूचनाही बोर्डाने शाळांना केल्या आहेत. जर विद्यार्थी नापास झाला तर बोर्डाने अशा विद्यार्थ्यांची कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच पुरवणी परीक्षा घेण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. सीबीएसई बारावी निकाल २०२१ सीबीएसई बोर्डाने आपल्या अधिकृत पोर्टल वर इयत्ता बारावीचे गुण अपलोड करण्यासाठी लिंक ओपन केली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षांचे गुण ५ जुलै २०२१ पर्यंत पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. ११ वीचे गुण २ जुलैपर्यंत जमा करायचे आहेत. सीबीएसई बारावी २०२१ निकाल ३१ जुलै २०२१ किंवा त्यापूर्वी जाहीर करावयाचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UdUmAa
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या