Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २ जुलै, २०२१, जुलै ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-02T06:47:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्लीच्या पालकांना दिलासा, खासगी शाळांच्या फीसमध्ये १५ टक्के कपात Rojgar News

Advertisement
Fee: करोना काळात आर्थिक संकटातून जाणाऱ्या पालक वर्गाला दिल्ली सरकारने दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पालकांकडून घेतल्या गेलेल्या फीसमध्ये १५ टक्के कपात करण्याचा आदेश दिल्ली सरकारने सर्व खासगी शाळांना दिला आहे. उदाहरणार्थ, २०२०-२१ या वर्षात शाळेची वार्षिक फी ३०० असेल तर शाळांनी त्यामध्ये १५ टक्के कपात करुन पालकांकडून २५५० रुपये घ्यावेत. शाळांनी जर पालकांकडून यापेक्षा जास्त फी आकारली असेल तर ती परत करावी किंवा पुढच्या फीमध्ये सामावून घ्यावी असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. करोना काळात पालक वर्ग आर्थिक संकटाचा सामना करतोय. अशावेळी शालेय फीसमध्ये १५ टक्के कपात झाल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळेल असेल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले. पालक आर्थिक संकटात असतील तर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सहभागातून रोखू नये असेही ते म्हणाले. करोना काळात होणाऱ्या व्यावसायीकरण आणि लुटमार रोखण्यासाठी शाळेच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. दिल्ली सरकारचा हा निर्णय ४६० खासगी शाळांसाठी आहे ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. या ४६० शाळांव्यतिरिक्त सर्व शाळांना दिल्ली सरकारचे फीस संदर्भातील जुने नियम कायम राहणार आहेत. करोना काळात फीस कपात ही सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गासाठी दिलासादायक बातमी आहे. शाळा ३१ जुलैपर्यंत बंद दिल्ली सरकारने करोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील सर्व शाळा ३१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना या महिन्याच्या सुरुवातीला एक पत्र लिहिलं होतं. शाळांबाबत नवी भूमिका घेण्याचा सल्ला त्यांनी या पत्रात दिला होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AkhU6R
via nmkadda