Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जुलै, २०२१, जुलै ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-06T06:47:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE: २०२२मध्ये कोणत्या परिस्थितीत कसा असेल १०वी, १२वीचा निकाल? जाणून घ्या Rojgar News

Advertisement
10th 12th Exams 2022: येणाऱ्या दिवसात करोनाची स्थिती काय असेल? हे आत्ताच स्पष्ट सांगता येणार नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Virus 3rd Wave) शंका वर्तविण्यात येत आहे. परिस्थिती काही असली तरी दहावी, बारावी बोर्ड परीक्षा आणि रिझल्टसंदर्भात काही अडचणी येऊ नयेत याची काळजी बोर्डाने घेतली आहे. यासाठी नवा असेसमेंट पॅटर्न (CBSE assessment pattern 2021-22) तयार करण्यात आला आहे. कोणत्या परिस्थितीत दहावी, बारावीचा रिझल्ट कसा तयार होईल? याावर सीबीएसईने स्पष्टीकरण दिले आहे. सीबीएसईने यावर्षी दहावी आणि बारावी दोन टर्ममध्ये विभागले आहेत. दोन्ही इयत्तांसाठी दोन टर्म परीक्षा होतील. सोबतच इंटरनल असेसमेंट, प्रॅक्टीकल्स आणि प्रोजेक्ट वर्क देखील मागितला जाईल. ही परीक्षा कधी होईल? याचा पॅटर्न काय असेल? याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल. CBSE 2022:कोणत्या परिस्थितीत कसा असेल निकाल? १) परिस्थिती सुधारली आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा दिली तर? बोर्डातर्फे टर्म १ आणि टर्म २ परीक्षा होतील. या परीक्षा शाळा किंवा परीक्षा केंद्रावर घेतल्या जातील. सर्व पेपरचे थेअरी मार्क्स दोन टर्म एक्झाममध्ये विभागले जातील. २)करोना प्रादुर्भावामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये शाळा बंद राहील्या पण टर्म एक्झाम शाळा किंवा सेंटर्सवर झाली तर? विद्यार्थ्यांसाठी टर्म एक्झाम (एमसीक्यू आधारे) ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून घरुनच देतील.अंतिम निकालामध्ये या परीक्षेच्या गुणांचे वेटेज कमी केले जाईल आणि टर्म २ एक्झामचे वेटेज वाढवले जाईल. ३)करोनामुळे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये शाळा बंद असतील पण टर्म१ परीक्षा शाळा किंवा परीक्षा केंद्रात झाली तर? टर्म-१ मध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आणि इंटरनल असेसमेंटच्या आधारे अंतिम निकाल बनेल. टर्म-१ परीक्षेचे वेटेज वाढवले जाईल. ४) केरोनामुळे शाळा पूर्णपणे बंद ठेवावी लागली आणि टर्म -१ आणि २ दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरुन द्यावी लागली तर? अशा परिस्थितीत अंतिम निकाल हा इंटरनल असेसमेंट्स, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट वर्क आणि टर्म -१ आणि टर्म -२ थेअरी एक्झाम (जी विद्यार्थी घरुन देतील) च्या आधारे बनेल. घरुन दिलेली परीक्षेचे वेटेज हे त्या परीक्षांचे निरीक्षण, विश्वसनीयता आणि योग्यतेवर अवलंबून असेल. CBSE Internal Assessment 2021: इंटरनल असेसमेंट पॅटर्न कसा असेल ?२०२२ बोर्ड परीक्षेबद्दल सीबीएसईने निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार,संबंधित प्रशासनाद्वारे फिजिकल क्लासेसची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ऑनलाईन क्लासेस सुरु राहतील. या दरम्यान टर्म -१ आणि टर्म-२ च्या व्यतिरिक्त वर्ग ९वी ते १२वी पर्यंत संपूर्ण वर्षांच्या इंटरनल असेसमेंट घेतले जातील. ९वी आणि १०वी साठी ३ पीरियॉडिक टेस्ट, स्टुडन्स्ट एनरिचमेंट, पोर्टफोलिओ आणि प्रॅक्टीकल वर्क/स्पिकिंग-लिसनिंग अॅक्टीव्हीटी/प्रोजेक्ट ११वी आणि १२वीसाठी - प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर टेस्ट किंवा यूनिट टेस्ट, एक्स्प्लोरेटरी अॅक्टीविटीज, प्रॅक्टीकल्स आणि प्रोजेक्ट्स. इंटरनल असेसमेंट्सच्या पूर्ण गाईडलाइन्स २०२१-२२ च्या अभ्यासक्रमासोबत जाहीर केल्या जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yuloSu
via nmkadda