TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MAH MCA CET 2021 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने () एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी () ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर परिपत्रक सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. यंदाची सीईटी राज्यात आणि राज्याबाहेरील काही काही परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सध्या नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, राज्यातील करोनाची परिस्थिती निवळल्यावर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला १००० रुपये शुल्क आहे; तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याला ८०० रुपये शुल्क आहे. सीईटीची माहिती पुस्तिका आणि परीक्षेबाबत अधिक माहिती https://ift.tt/3Azar3W या लिंकवर उपलब्ध आहे. कसा कराल MAH MCA CET 2021 साठी अर्ज? 1. MAH MCA CET 2021 Registration Website या संकेतस्थळावर जा. 2. "Click here for New Registration" असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. 3. सर्व माहिती नीट वाचून OK म्हणा. 4. Regisration चा प्रकार निवडा - Aadhaar किंवा Non Aadhaar. 5. वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक, शैक्षणिक माहिती आणि तपशील भरा. 6. Enter आणि save करा. 7. Security Key भरा. 8. Register बटणावर क्लिक करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hHQZtv
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या