Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T12:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT 2021च्या निकालाची तारीख ठरली; काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
2021: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कंसोर्टियमने कॉमन लॉ प्रवेश चाचणी (CLAT) च्या निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. CLAT २०२१ चा निकाल २८ जुलैला घोषित होणार आहे. CLAT परीक्षा २३ जुलैला ऑफलाइन माध्यमातून घेण्यात आली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर निकाल आणि काऊन्सिलिंगचे वेळापत्रक पाहु शकतात. संस्थेने याआधी २३ जुलैला रात्री ९ वाजता CLAT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली होती. त्यानंतर उमेदवारांना २४ जुलै रात्री ९ पर्यंत आक्षेप नोंदविण्याचा वेळ दिला होता. वेळापत्रकानुसार प्रत्येक श्रेणीत जागांच्या संख्येपेक्षा पाचपट अधिक संख्येत अर्ज मिळाल्यानंतर २९ जुलैला काऊन्सिलिंगसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होईल. काऊन्सिलिंग प्रक्रिया ३० जुलैला संपणार आहे. उमेदवारांना जागा मिळवण्यासाठी ५० हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. पहिली अलॉटमेंट लिस्ट १ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या उमेदवारांना सीट स्वीकारावी लागेल. त्यासोबतच महत्वाची कागदपत्र अपलोड करावी लागतील. तसेच ५ ऑगस्टआधी NLU ची फीस भरावी लागणार आहे. दुसरी अलॉटमेंट लिस्ट ९ ऑगस्टला जाहीर केली जाईल. आणि तिसरी अलॉटमेंट लिस्ट १३ ऑगस्टला जाहीर करण्यात येईल. कंसोर्टियमने दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी पहिली ते चौथी अलॉटमेंट लिस्टमध्ये जागा निवडल्या आहेत आणि ज्यांना आपला प्रवेश मागे घ्यायचा आहे त्यांना १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i2pcVV
via nmkadda