Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T12:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NTA ICAR AIEEA 2021: एनटीएतर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, अर्ज प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

Advertisement
NTA ICAR AIEEA 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) च्या ऑल इंडिया प्रवेश परीक्षा AIEEA (यूजी), AIEEA (पीजी) आणि एआयसीई-जेआरएफ/एसआरएफ (पीएचडी) साठी अर्ज सुरु केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि icar.nta.ac.in जाऊन अर्ज करु शकतात. २० ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेची तारीख ( Exam Schedule) जाहीर झाली आहे. एआयईईए (यूजी)साठी प्रवेश परीक्षा ७,८ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. एआयईईए (पीजी) आणि एआयसीई-जेआरएफ/एसआरएफ (पीएचडी) साठी परीक्षा १७ सप्टेंबरला होणार आहे. तसेच पदवीसोबत ज्युनियर रिसर्च फेलो आणि सिनीअर रिसर्च फेलोमध्ये प्रवेश, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जे उमेदवार ही परीक्षा पास करतील आणि मेरिल लिस्टच्या माध्यमातून पास करतील त्यांना काऊन्सिलिंग सत्रासाठी उपस्थित राहावे लागेल. असा करा अर्ज या परीक्षांसाठी अर्ज करताना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icar.nta.ac.in वर जा. होमपेजवर असणाऱ्या Application Form लिंकवर क्लिक करा इथे New Registration लिंकवर क्लिक करा आता मागितलेली माहिती भरुन नोंदणी करा फॉर्म भरण्यासाठी फोटो आणि सही अपलोड करा शेवटी फीस जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करा परीक्षेचा तपशिल ही परीक्षा कॉम्प्युटर आधारीत माध्यमातून (Computer Based Test, CBT) आयोजित केली जाणार आहे. यूजी लेवलसाठी ही अडीच तासांची परीक्षा असेल. पीजी आणि जेआरएफ/ एसआरएफसाठी दोन तासांची परीक्षा असेल. यूजी स्तर (Under Graduate)च्या परीक्षेत एकूण १५० प्रश्न विचारले जातील. पीजी स्तर (Post Graduation Level) परीक्षेमध्ये १६० प्रश्न विचारले जातील, तर जेआरएफ/एसआरएफ परीक्षेमध्ये २०० प्रश्न विचारले जातील. ICAR AIEEA- (UG)साठी भारतातील १७८ शहर आणि ICAR AIEEA (PG) आणि AICE JRF/SRF- (PhD) प्रवेश परीक्षेसाठी भारतामध्ये ८९ शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. आयसीएआरतर्फए आधी एआयईईए (यूजी, पीजी, जेआरएफ/एसआरएफ) परीक्षेचे आयोजन केले जायचे. पण आता राष्ट्रीय परीक्षण एजन्सीला यूजी, पीजी आणि एसआरएफ/जेआरएफमध्ये प्रवेशासाठी सर्व तिन्ही परीक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/372gj8o
via nmkadda