FMGE June 2021 रिझल्ट जाहीर, असा तपासा Rojgar News

FMGE June 2021 रिझल्ट जाहीर, असा तपासा Rojgar News

FMGE June 2021: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम (FMGE)चा निकाल जाहीर झाला आहे. १८ जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल तपासण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (एनबीई) अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. natboard.edu.in आणि nbe.edu.in वर जाऊन निकाल पाहता येईल. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सध्या हा निकाल पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण गुणपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. उमेदवार एफएमजीई वेबसाइट https://nbe.edu.in/ वरून ६ जूनपासून त्यांचे वैयक्तिक गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील. उमेदवारांना वैयक्तिकरित्या गुणपत्रिका पाठविली जाणार नसल्याचे एनबीएने स्पष्ट केले आहे. फेस आयडी पडताळणी, कोर्ट प्रकरण किंवा सुरक्षितते कारणास्तव काही उमेदवारांचे निकाल रोखले गेले आहेत. एफएमजीई जून २०२१ सत्र निकालाच्या प्रश्नांसंदर्भात ०११- ४५५९३०० किंवा exam.natboard.edu.in/commonication वर चौकशी करु शकता. ज्या उमेदवारांना ३०० पैकी कमीत कमी १५० गुण आहेत त्यांना पात्र मानले जाईल. जे ६ जुलैपर्यंत आपली गुणपत्रिका डाऊनलोड करु शकता. पात्र उमेदवार ११ जूनपासून यूजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन एफएमजीई प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. याआधी एफएमजीईने प्रवेश पत्र २०२१ हे १६ एप्रिलला nbe.edu.in वर जाहीर केले आहे. एफएमजीई स्क्रिनिंग टेस्ट राष्ट्रीय चिकित्सा आयोग (NMC) किंवा राज्य चिकित्सा परिषदेद्वारे (SMC) आजीवन प्रमाणपत्रासाठी आयोजित केली जाते. एफएमजीई परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ज्या उमेदवारांना मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI) किंवा स्टेट मेडिकल काऊन्सिल (SMC)कडून आजीवन नोंदणी हवी त्यांना प्रॅक्टीस आणि मेडिसिन इन इंडियाचा अभ्यास करावा लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dzxKB4
via nmkadda

0 Response to "FMGE June 2021 रिझल्ट जाहीर, असा तपासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel