Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ जुलै, २०२१, जुलै ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-01T08:47:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT मुंबईत नवा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम Rojgar News

Advertisement
Introduced New Programme: आयआयटी मुंबईत लिबरल आर्ट्स आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. आयआयटी संस्थेमध्ये लिबरल आटर्सचा अभ्यासक्रम सुरु होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहीलीच वेळ मानली जातेय. निवडक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग , नॅचरल सायन्स, सोशल सायन्स, आर्ट आणि डिझाइनमध्ये बीएस पदवी (LASE Programme) मिळवता येणार आहे. या चार पर्यायांव्यतिरिक्त विद्यार्थी त्यांचे वैयक्तिक स्पेशलायझेशन करु शकतात असे संस्थेचे संचालक सुभाष चौधरी यांनी म्हटले. ही बॅच यावर्षीच्या बी टेक प्रोग्रामला उपस्थित राहू शकते. २०२२ च्या अखेरिस हा प्रोग्राम असेल. या प्रोग्राममध्ये त्यांच्या सहभागाला प्राधान्य असेल असेही ते म्हणाले. पहिल्या वर्षासाठी ३० जागा रिक्त असून यासाठीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार यावर अंतिम निर्णय व्हायचा असल्याचे प्राध्यापक अनुराग मेहरा म्हणाले. ते LASE प्रोग्रामचे सह समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. आम्ही संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग, सोशल आणि नॅचरल सायन्स, आर्ट आणि डिझाइन यासाठी विस्तृ पर्याय खुला करत आहोत. पण अनेक विद्यार्थी असेही असतील त्यांना यामध्ये आवड नसेल त्यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून हा प्रोग्राम डिझाइन करण्यासाठी कमिटी मेहनत घेत आहे. इंस्टिट्यूट बोर्ड आणि सिनेटमध्ये या प्रोग्रामला संमती मिळाली आहे. पहिल्या वर्षातील BTech प्रोग्रामसहित विद्यार्थी केवळ चार वर्ष कॅम्पसमध्ये असतील. LASE च्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी त्यांच्या शैक्षणिक सल्लागाराशी बोलून आपला विषयाचे कॉम्बिनेशन निवडता येईल असे सोशल मीडिया पदावरील संचालक म्हणाले. त्यानंतर पूर्णवेळ कोर्स निवडण्याचा अधिकार हा विद्यार्थ्यांकडे असेल. आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI), ED tech आणि हेल्थकेअर इंजिनिअरिंग (इंजिनिअरिंग सायन्स करतावेळी) किंवा बायोलॉजी (नॅचरल सायन्स करतावेळी) या अभ्यासक्रमाच्या शक्यता आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट करावा लागणार असल्याचे संचालक म्हणाले. तसेच संस्थेतर्फे पदवी अंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्याचा देखील विचार असल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AcCJBr
via nmkadda