Advertisement

IAF CASB 2021: सेंट्रल एअरमॅन सिलेक्शन बोर्ड (CASB), भारतीय वायू दलातर्फे (IAF) ग्रुप X आणि ग्रुप Y ट्रेडमध्ये एअरमॅन पदांची भरती होणार आहे. यासाठी प्रवेश पत्र जाहिर करण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षेसाठी यशस्वीरित्या अर्ज केलाय ते अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता. १२ जुलै ते १८ जुलै दरम्यान परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवाराला सर्वात आधी अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in जावे लागेल.त्यानंतर होमपेजवर असलेल्या उमेदवार सेक्शनमध्ये Login for intake 01/2022 लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन टॅब ओपन होईल. इथे उमेदवारांनी आपला ईमेल आयडी, पासवर्ड आणि केप्चा भरुन साइन इन करा. आता तुमचे प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल. यामध्ये दिले गेलेले डिटेल्स तपासा. पुढील उपयोगासाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि प्रत स्वत:कडे ठेवा. एअरमॅन पदाच्या भरतीसाठी जानेवारी २०२१ मध्ये नोटिफिकेशन जाहिर करण्यात आले होते. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र अविवाहित उमेदवारांनी अर्ज केले होते. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन भरतीची प्रक्रिया २२ जानेवारी २०२१ ला सुरु करण्यात आली होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२१ ठेवण्यात आली होती. आधी ऑनलाइन परीक्षेची तारीख १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ पर्यंत ठेवण्यात आली होती. दरम्यान देशभरात करोना केसेस वाढल्यानंतर या तारखांवर परीक्षा होऊ शकली नाही. तेव्हा ही परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यानंतर या परीक्षेसाठी नव्या तारखांची घोषणा करण्यात आली होती. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी असणार आहे. परीक्षा पॅटर्नची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qYNi6O
via nmkadda