Advertisement

PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे पालिका आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. यानुसार एकूण २५ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सफाईसेवाक पदाच्या २५ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच पात्रतेसंदर्भातील निकष जाहिरातीत देण्यात आले आहेत. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता मुलाणी (सफाईसेवक) पदाच्या २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी राखीव वर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. उमेदवाराने किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे सफाईसेवक पदाचा १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा खुल्या वर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा ही ३८ वर्षांची आहे. तर राखीव वर्गाला वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे. राखीव वर्गासाठी वयोमर्यादा आणखी ५ वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. राखीव वर्गातील ४३ वर्षांपर्यतचा उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतो. महत्वाची कागदपत्र उमेदवारांनी अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, आवश्यक कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रती सोबत ठेवणे गरजेचे आहे. अर्ज करताना जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत जोडणे गरजेचे आहे. पदाचा कालावधी उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. यात काही चूक आढळल्यास अर्ज रद्द ठरविण्यात येणार आहे. उमेदवाराची निवड ही ११ महिन्यांसाठी असणार आहे. त्यामुळे ही कायमस्वरुपी नसेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मानधन या पदासाठी पात्र उमेदवारांना १७ हजार २०५ रुपये मानधन मिळणार आहे. अर्जासाठी पत्ता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, , मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे- ०५ इथे पाठवायचा आहे. यासाठी १२ जुलै २०२१ ही मुदत देण्यात आली आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज भरताना माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज रद्द ठरवण्यात येईल. यासंदर्भातील जाहिरात अधिकृत वेबसाइट www.pmc.gov.in वर उपलब्ध आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e2GOyB
via nmkadda